Renuka Swamy News : रेणुका स्वामी हत्ये प्रकरणात नवा ट्वीस्ट, लोकप्रिय अभिनेत्याला पोलिसांकडून अटक

Darshan Thoogudeepa News : लोकप्रिय कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा याला बंगळुरू पोलिसांनी एका गंभीर प्रकरणामध्ये आज ताब्यात घेतलं आहे.
Renuka Swamy News : रेणुका स्वामी हत्ये प्रकरणात नवा ट्वीस्ट, लोकप्रिय अभिनेत्याला पोलिसांकडून अटक
Renuka Swamy NewsSaam Tv

साऊथ इंडस्ट्रीतून एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. लोकप्रिय कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा याला बंगळुरू पोलिसांनी एका गंभीर प्रकरणामध्ये आज ताब्यात घेतलं आहे. एका हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीने अभिनत्याचे नाव घेतल्यामुळे त्याच्यावर कामाक्षिपाल्या पोलिसांनी कारवाई केली आहे. दर्शन थुगुदीपा सतत आरोपींच्या संपर्कात असल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे..

Renuka Swamy News : रेणुका स्वामी हत्ये प्रकरणात नवा ट्वीस्ट, लोकप्रिय अभिनेत्याला पोलिसांकडून अटक
Mirzapur 3 : प्रतीक्षा संपली; "कर दिये है प्रबंध...", लक्षवेधी पोस्टरसह 'मिर्झापूर ३'ची रिलीज डेट आली समोर

मिळालेल्या माहितीनुसार, रेणुकास्वामी नावाच्या व्यक्तीची चित्रदुर्ग येथील सुमनहल्ली पुलावर हत्या करण्यात आलेली होती. याप्रकरणी पोलिसांनी रेणुकाच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर याप्रकरणी अभिनेत्याला कामाक्षिपाल्या पोलिसांनी अटक केली आहे. दर्शनला त्याच्या म्हैसूर येथील फार्म हाऊसमधून अटक करण्यात आली आहे. दर्शनला म्हैसुरहून बेंगळुरूला आणले जात आहे. कारण गुन्ह्याची नोंद कामाक्षिपल्य पोलिसांच्या हद्दीत केली आहे

नेमकं प्रकरण काय ?

कर्नाटकातील चित्रदुर्गमध्ये राहत असलेल्या रेणुका स्वामीने अभिनेत्री पवित्रा गौडाला अश्लील मेसेज पाठवले होते. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री पवित्रा गौडा आणि अभिनेता दर्शन थुगुदीपा यांचे अफेअर होते. ८ जूनला रेणुकाची हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह ९ रोजी सापडला. सुरुवातीला पोलिसांना रेणुकाने आत्महत्या केल्याचा संशय होता. पण पोलिस तपासात मात्र पोलिसांना तिची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. रेणुकाची हत्या बेंगळुरूमधील दर्शनच्या जवळच्या मित्राच्या गॅरेजमध्ये त्याची हत्या झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

Renuka Swamy News : रेणुका स्वामी हत्ये प्रकरणात नवा ट्वीस्ट, लोकप्रिय अभिनेत्याला पोलिसांकडून अटक
OTT Released This Week : ‘चंदू चैंपियन’ ते ‘द बॉयज ४’.... या आठवड्यात थिएटरमध्ये आणि ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी

या प्रकरणामध्ये दर्शनासह इतरत्र १० जणांविरुद्ध पोलिसांत तक्रारही नोंदवली असून त्यांना अटकही केली आहे. जर या प्रकरणामध्ये अभिनेता आरोपी म्हणून सिद्ध झाल्यास त्याला खुप मोठी शिक्षा भोगावी लागेल. चित्रपटाच्या शुटिंगनिमित्त अभिनेता दर्शन शुटिंगनिमित्त म्हैसुरमध्ये होता. तो ज्येष्ठ अभिनेता थुगुदीपा श्रीनिवास यांचा मुलगा आहे. त्याने २००१ मध्ये अभिनयविश्वात पदार्पण केले असून त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Renuka Swamy News : रेणुका स्वामी हत्ये प्रकरणात नवा ट्वीस्ट, लोकप्रिय अभिनेत्याला पोलिसांकडून अटक
Ketaki Chitale : 'हिंदू राष्ट्र चाहिए हमें प्रधानमंत्रीजी'; अभिनेत्री केतकी चितळेची पंतप्रधान मोदींकडे मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com