Khel Khel Mein Trailer  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Khel Khel Mein चा ट्रेलर रिलीज, गेममधून होणार मित्र- मैत्रिणींची पोलखोल

Khel Khel Mein Trailer Out : कॉमेडी चित्रपट 'खेल खेल में' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, एमी वर्क, तापसी पन्नू आणि वणी कपूर या ॲक्टर्सने धमाकेदार काम केलेले आहे.

Apurva Kulkarni

अक्षय कुमारचा कॉमेडी चित्रपट 'खेल खेल में' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये अक्षय कुमार आणि त्याच्या मित्रांमध्ये लागलेली स्पर्धा आणि त्यातून होणारी पोलखोल कॉमेडी पद्धतीनं चित्रपटात मांडण्यात आली आहे. कॉमेडी चित्रपट 'खेल खेल में' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, एमी वर्क, तापसी पन्नू आणि वणी कपूर या ॲक्टर्सने धमाकेदार काम केलेले आहे. १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.

२०१६ मध्ये रिलीज झालेल्या 'परफेक्ट स्ट्रेंजर्स'चा 'खेल खेल में' हा चित्रपट हिंदी व्हर्जन आहे. ट्रेलरमध्ये मित्र आपापसात भेटतात आणि पार्टी करण्याचे ठरवतात. जेव्हा पार्टीमध्ये सगळे मित्र-मैत्रिण एकत्र येतात तेव्हा ते एक गेम खेळण्याचं ठरवतात. मोबाईल फोन अनलॉक करून टेबलवर ठेवण्याची ही स्पर्धा असते. ज्याला पहिल्यांदा फोन किंवा मॅसेज येईल तो सर्वांना वाचून दाखवेल. अशी अट या स्पर्धेत असते. याचाच आधार घेत हा चित्रपट बनवण्यात आला आहे. यातून सगळ्यांची होणारी पोलखोल आणि अनेक गुपित मनोरंजक पद्धतीने मांडण्यात आले आहे.

'खेल खेल में' चित्रपटाचे दिग्दर्शन मुदस्सर अजीज यांनी केले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दाखवली असून आता प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित होण्याची उत्सुकता लागलेली आहे. १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'खेल खेल में' चित्रपटासोबतच हॉरर कॉमेडी फिल्म 'स्त्री २' देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे दोन्ही चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

SCROLL FOR NEXT