Gadar 2- OMG 2 2nd Day Box Office Collection Twitter
मनोरंजन बातम्या

Gadar 2- OMG 2 2nd Day Collection: ‘गदर २’ ने ‘OMG 2’ ला कमाईमध्ये मागे टाकलं, सनी देओलच्या चित्रपटाची १०० कोटींकडे वाटचाल

Gadar 2- OMG 2 Box Office Collection: ‘गदर २’ आणि ‘OMG 2’ने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी किती कोटींची कमाई केली जाणून घेऊया...

Chetan Bodke

Gadar 2- OMG 2 2nd Day Box Office Collection: सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत असलेल्या ‘गदर २’ची प्रदर्शनाच्या पहिल्या दिवासापासूनच बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई सुरू आहे.

‘गदर २’ आणि ‘OMG 2’ एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले आहे. दोन्हीही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंगनंतर चित्रपटाने दुसऱ्या दिवशी आणखी धमाका केला आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ ने दुसऱ्या दिवशी अनेक विक्रम मोडले आहेत.

त्यामुळे सध्या चित्रपट कमाईच्या बाबतीत बराच चर्चेत आला आहे. सनी देओलच्या ‘गदर २’ने तर कहरच निर्माण केला आहे पण अक्षय कुमारचा ‘OMG 2’ देखील त्याला चांगलीच टक्कर देत आहे. चला तर जाणून घेऊया दोन्ही ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरील कमाई...

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ‘गदर २’च्या कमाईविषयी ट्वीट केलं आहे, ‘गदर २’ ने दुसऱ्या दिवशी देशात ४३.०८ कोटीं इतकी कमाई केली आहे. चित्रपटाला विकेंडचा चांगलाच फायदा झालेला आहे. पहिल्याच विकेंडला चित्रपटाने ३ कोटींचा नफा मिळवला आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ने अवघ्या दोन दिवसांतच ८३.१० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचे बजेट एकूण ७५ कोटींचे होते. चित्रपटाने दोन दिवसातच चित्रपटाचा खर्च वसूल केला आहे.

सोबतच ‘OMG 2’च्या कमाईवरही चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी भाष्य केले आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी अवघ्या १० कोटींचीच कमाई केली होती. पण या चित्रपटाला देखील विकेंडचा चांगलाच फायदा झाल्याचा दिसून येत आहे. पहिल्याच विकेंडला चित्रपटाने २५ कोटींचा नफा कमावला आहे. चित्रपटाचं एकूण बजेट १५० कोटींचं होतं. चित्रपटाला आपल्या बजेट पर्यंत पोहोचण्यासाठी अजून थोडी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

दोन्ही चित्रपटांना येत्या दिवसांमध्ये येणाऱ्या सुट्ट्यांचा चांगलाच फायदा होणार आहे. दोन्ही चित्रपट पहिल्याच आठवड्यात उत्तम कलेक्शन करतील, असा विश्वास सर्वत्र दाखवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT