Drishyam 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Drishyam 2: 'दृश्यम २'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड, काही दिवसातच कमावले कोट्यावधी...

'दृश्यम २' ठरला बॉलिवूडचा २०२२मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट.

Pooja Dange

Drishyam 2 Box Office Collection: बॉलिवूड चित्रपटांसाठी २०२२ हे वर्ष इतके खास नव्हते. बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. काही थेट ओटीटीवर प्रदर्शित झाले. मोजक्याच चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश त्यातील एक चित्रपट म्हणजे अजय कुमारचा 'दृश्यम २'. 'दृश्यम २' 'अवतार २' प्रदर्शित झाल्यानंतरही चित्रपटगृहांमध्ये तग धरून आहे.

'दृश्यम २' १८ नोव्हेंबर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये ७ वर्षांनंतर अजय देवगणने केलेल्या खुनाचा तपास केला जात आहे. दृश्यमच्या या भागात पोलिस अधिकारी अक्षय खन्ना या प्रकरणाचा तपास करत आहे. हा थ्रिलर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत. नवीन वर्षानिमित्त प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केले आहे.

'दृश्यम २'ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. समीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले होते. गेले ७ आठवडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकून आहे. ३१ डिसेंबर २०२२च्या शनिवारी या चित्रपटाने १.३४ करोडचा गल्ला जमावाला आहे. तर रविवारी २०२३च्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने २.१५ करोडची कमाई केली आहे. या चित्रपटाची एकूण कमाई २३५.०१ करोड इतकी आहे.

'दृश्यम २' ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित झाला आहे. अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हला आहे चित्रपट पाहता येणार आहे. परंतु हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला १९९ रुपये भरावे लागणार आहेत. चित्रपटाची प्रेक्षकांमधील आवड पाहून निर्मात्यांनी या चित्रपटासाठी पैसे आकारले आहेत.

'दृश्यम २' बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत 'अवतार २' पुढे केला नाही. परंतु अजय देवगणच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बीड जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

SCROLL FOR NEXT