Don 3 In Ranveer Singh Twitter
मनोरंजन बातम्या

Don 3 Teaser: अमिताभ, शाहरुखनंतर बॉलिवूडला मिळाला तिसरा डॉन, ‘डॉन ३’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित

Don 3 In Ranveer Singh: फरहान अख्तर निर्मित आणि दिग्दर्शित ‘डॉन ३’चा नुकताच सोशल मीडियावर टीझर प्रदर्शित झाला आहे.

Chetan Bodke

Don 3 Teaser: फरहान अख्तर निर्मित आणि दिग्दर्शित ‘डॉन ३’ची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. फरहानने मंगळवारी अर्थात ८ ऑगस्ट रोजी सोशल मीडियावरून ‘डॉन ३’ ची घोषणा केली होती. अशातच ‘डॉन’च्या फ्रँचायझी निर्मात्यांनी एक नवीन टीझर प्रदर्शित करत ‘डॉन ३’ची अधिकृत घोषणा केली आहे. काल घोषणा करतेवेळी चित्रपटात कोणता अभिनेता असणार याची माहिती देण्यात आलेली नव्हती. पण आता टीझर शेअर करताना चित्रपटात कोणता अभिनेता दिसणार याची अखेर प्रेक्षकांना माहिती मिळाली आहे.

८ ऑगस्टला चित्रपटाचे दिग्दर्शक फरहान अख्तरने अधिकृत रित्या चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत अमिताभ बच्चन आणि शाहरुख खाननंतर आता रणवीर सिंगने डॉनच्या सिक्वेलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. अवघ्या काही मिनिटाच्या या टीझरमध्ये रणवीर सिंगचा जबरदस्त लूक आणि डायलॉग्स प्रेक्षकांचे लक्ष स्वत:कडे वेधत आहे. अभिनेत्याने त्याच्या लूकवर चांगलेच काम केलं आहे.

दिग्दर्शकाने शेअर केलेल्या टीझरमध्ये, टीझरच्या सुरूवातीला रणवीर सिंग भारदस्त लूकमध्ये काही डायलॉग्स बोलताना दिसत आहे. रणवीर सिंग एका गगनचुंबी इमारतीमध्ये बसलेला दिसत असून त्याच्या डायलॉग्सने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. “११ मुल्कों की पुलिस ढूंढती है मुझे, पर पकड़ पाया है मुझको कौन? मैं हूं डॉन.” अभिनेत्याच्या या डायलॉगने सर्वांचेच लक्ष स्वत:कडे वेधले आहे. ‘डॉन’च्या पहिल्या भागापासून बॉलिवूडमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. ‘डॉन’च्या फ्रँचायझीमधला हा चौथा चित्रपट आहे. बिग बींनी पहिल्यांदा १९७८ मध्ये डॉन चित्रपट केला होता. त्याचे दिग्दर्शन चंद्रा बारोट यांनी केले होते.

तर पुढच्या भागाचे दिग्दर्शन फरहान अख्तरने केले असून तो चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्या सिक्वेलमध्ये शाहरुखने डॉनची प्रमुख भूमिका साकारली आहे. शाहरुखचा डॉन लूक प्रेक्षकांना फारच भावल्यामुळे २०११ मध्ये पुन्हा एकदा फरहानने शाहरुखसोबतच ‘डॉन २’ बनवला. पण आता फरहान अख्तरने ‘डॉन ३’मध्ये शाहरुखला न घेता ‘डॉन’ची ओळख प्रेक्षकांना करुन दिलीय. रणवीरचा हा जबरदस्त लूक पाहून त्याला डॉनच्या अवतारात पहण्यासाठी चाहते उत्सूक आहेत, काहींनी त्या लूकला चांगलाच प्रतिसाद दिला आहे, तर काहींनी रणवीरला विरोध केला आहे. अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान सारख्या दिग्गज सेलिब्रिटींची जागा रणवीरने घेतल्यामुळे त्याला नेटकरी प्रचंड ट्रोल करत आहेत.

'बाजीराव मस्तानी' असो किंवा 'बेफिक्रे', रणवीर सिंगने प्रत्येक वेळी आपल्या भूमिका उत्तमप्रकारे साकारल्या आहेत. भयानक भूमिका असो किंवा खोडकर... त्याच्या भुमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकतो. ‘डॉन ३’ मधील अभिनेत्याच्या लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

SCROLL FOR NEXT