India's Got Talent :सोलापूरच्या पठ्ठ्याने इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये केला अनोखा विक्रम; आदित्यचे कौशल्य पाहून परिक्षकांनाही पडली भूरळ

India's Got Talent News : महाराष्ट्रातील एक तरुण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरण्याच्या तयारीत आहे.
India's Got Talent
India's Got TalentSaam Tv
Published On

India's Got Talent Aditya Kodmur News

प्रत्येकामध्ये काहीतरी नवीन टॅलेंट दडलेलं असते. फक्त गरज असते ती या टॅलेंटला एक प्लॅटफॉर्म मिळण्याची. भारतात अनेकांमध्ये कौतुक करण्यासारखे टॅलेंट आहे. या टॅलेंटच्या जोरावर महाराष्ट्रातील एक तरुण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरण्याच्या तयारीत आहे.

तुम्ही कधी कलिंगडात पत्ते फेकून मारलेत का? आणि मारले असतील तर तुमचे पत्ते कलिंगडात रुतलेत का? आश्चर्य वाटलं असेल ना हे ऐकून. पण सोलापूरातील एका तरुणाला कलिंगडात पत्ते फेकून मारण्याची अनोखी कला येते. त्याच्या या कलेने संपूर्ण देशाला अचंबित केले आहे.(Latest Entertainment News)

India's Got Talent
Tiger Shroff News: टायगर श्रॉफ महाभारतात साकारणार हनुमानाची भूमिका? अभिनेत्याचं उत्तर एकूण नेटकरीही शॉक

सोनी वाहिनीवरील 'इंडियाज गॉट टॅलेंट' या कार्यक्रमात नेहमी नवनवीन टॅलेंट पाहायला मिळतात. भारतातून अनेक ठिकाणांहून लोक आपलं टॅलेंट लोकांसमोर आणण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी होतात. या कार्यक्रमाशी शान आता एक मराठमोळ्या तरुणाने वाढवली आहे.

सोलापूरचा आदित्य कोडमुरनेही या कार्यक्रमात भाग घेतला आहे. तो एक डोळे थक्क करणारे टॅलेंट दाखवणार आहे. विशेष म्हणजे आदित्यने याआधी ३ गिनीज वल्ड रेकॉर्ड मोडले आहेत. या कार्यक्रमात तो एका मिनिटात जास्तीत जास्त पत्ते कलिंगडात रुतवण्याचा प्रयत्न करणार आहे. पत्त्यांनी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आदित्य करणार आहे. आदित्यने हे अनोखे कौशल्य सराव आणि प्रचंड मेहनतीने जपले आहे.

India's Got Talent
Happy Birthday Mahesh Babu: दाक्षिणात्य सुपरस्टारचा युएसमध्ये डंका, ४९ व्या वर्षी गाजले ‘इतके’ चित्रपट

आदित्यचे कौतुक करताना परिक्षक शिल्पा शेट्टी म्हणाली, 'अनेक जादूगारांना मी पत्त्यांनी जादूचे प्रयोग करताना पाहिले आहे, पण अशा प्रकारची जादू, तीही पत्त्याने करताना मी पहिल्यांदाच बघत आहे. हे खूप आगळेवेगळे आणि खतरनाक देखील आहे. अप्रतिम!'

'इंडियाज गॉट टॅलेंट' हा कार्यक्रम शनिवार रविवार रात्री ९.३० वाजता सोनी वाहिनीवर प्रक्षेपित होतो. या कार्यक्रमात संपूर्ण भारतातून स्पर्धक सहभागी होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com