Director Death SAAM TV
मनोरंजन बातम्या

Director Death : बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, सिनेसृष्टी शोकसागरात

Kuku Kohli Death : बॉलिवूडचे हरहुन्नरी दिग्दर्शकाची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७७ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दिग्दर्शकाची कारकीर्द जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूड दिग्दर्शकाचे निधन

वयाच्या ७७ व्या वर्षी प्रसिद्ध दिग्दर्शकाने घेतला अखेरचा श्वास

दिग्दर्शकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता कुकू कोहली (Kuku Kohli) यांचे निधन झाले आहे. 'फूल और कांटे' या चित्रपटाद्वारे अजय देवगणच्या कारकिर्दीची सुरुवात करून देणारे ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक कुकू कोहली यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले.

मंगळवारी (२५ ऑगस्ट २०२६) रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका (कार्डियाक अरेस्ट) आला आणि त्यांचे निधन झाले. कुकू कोहली यांचे जवळचे मित्र आणि चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित यांनी ही माहिती दिली आहे. दिग्दर्शकाच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. चाहते आणि कलाकार मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यामातून श्रद्धांजली वाहिली आहे.

ज्येष्ठ चित्रपट निर्माते कुकू कोहली यांच्यावर बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. त्यांची अंत्ययात्रा सकाळी १०.३० वाजता अंधेरी पश्चिममधील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील 'ग्रीन ॲकर्स' या त्यांच्या निवासस्थानावरून निघेल.

कुकू कोहली, ज्यांचे खरे नाव अवतार कोहली होते, ते हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक होते. कुकू कोहली यांनी राज कपूर आणि इतर चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले. त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ आपल्या चित्रपटांनी चाहत्यांचे मनोरंजन केले. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात सनी देओल आणि अमृता सिंग अभिनीत 'बेताब' या चित्रपटाद्वारे सेकंड युनिट दिग्दर्शक म्हणून केली. त्यानंतर त्यांनी १९९१ मध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेल्या 'फूल और कांटे' या चित्रपटाद्वारे स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. यानंतर, या दिग्दर्शकाने 'कोहरम', 'सुहाग', 'हकीकत' आणि 'अनाड़ी नंबर 1' यांसारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT