Farhan akhtar Talk About Don 3 Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Farhan Akhtar Film : 'डॉन ३'च्या शुटिंगला केव्हापासून होणार सुरूवात?, फरहान अख्तरने दिली महत्वाची अपडेट

Farhan Akhtar On Ranveer Singh Don 3 Film : गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर 'डॉन ३' चा प्रोजेक्ट बंद केल्याची चर्चा सुरू झाली होती. अशातच या चर्चांवर खुद्द दिग्दर्शक फरहान अख्तरने भाष्य केले आहे.

Chetan Bodke

'डॉन' (Don) चित्रपटाच्या प्रत्येक सिक्वेलला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळालेला आहे. अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्यानंतर आता 'डॉन' म्हणून बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक फरहान अख्तर यांनी 'डॉन ३' ची घोषणा केलेली आहे. चित्रपटामध्ये नवा डॉन दिसणार म्हणून अनेकांनी चित्रपटाला विरोध केलेला होता. अशातच आता दिग्दर्शक फरहान अख्तरने चित्रपटाबद्दल महत्वाची माहिती दिलेली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर 'डॉन ३' चा प्रोजेक्ट बंद केल्याची चर्चा सुरू झाली होती. पण अशातच आता या चर्चांवर खुद्द दिग्दर्शक फरहान अख्तरने भाष्य केले आहे. मुलाखतीमध्ये दिग्दर्शक फरहान अख्तरने सांगितले की, "चित्रपटावर अजुनही काम सुरू आहे. प्रोजेक्ट बंद झालेला नाही. चित्रपटाच्या शुटिंगची सुरूवात २०२५ पासून सुरूवात होणार आहे. कारण की, रणवीर सिंहला त्याच्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायचा आहे."

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या शुटिंगला २०२५ पासून सुरूवात होणार आहे. कारण की, रणवीरला त्याच्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायचा आहे. येत्या सप्टेंबर २०२४ मध्ये दीपिका आणि रणवीर आई- बाबा होणार आहेत. त्यानंतर तो काही दिवस आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करणार आहे. रणवीर 'डॉन ३' व्यतिरिक्त अन्य चित्रपटांतही दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'डॉन ३'साठी निर्मात्यांनी रणवीरचे इतर प्रोजेक्ट्सही थांबवलेले आहेत.

'डॉन ३' चित्रपटाबद्दल सांगायचे तर, या चित्रपटामध्ये रणवीर सिंहसोबत बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीही दिसणार आहे. दोघेही पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र दिसणार आहे. त्याशिवाय रणवीर सिंह 'सिंघम अगेन'मध्येही दिसणार आहे. हा मल्टीस्टारर चित्रपट येत्या १ नोव्हेंबर २०२४ ला रिलीज होणार आहे. अन्य चित्रपटांतूनही रणवीर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Makeup Tips: ५ मिनिटांत व्हा तयार! या क्विक डेली मेकअप टिप्स नक्की वापरा, मिळेल ग्लॅमरस लूक

Pregnancy Care: उन्हाळ्यात प्रेग्नन्सी? डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

EPFO Recruitment: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; EPFO मध्ये भरती; अर्ज कसा करावा?

Accident : मुंबईत हिट अँड रनचा थरार, भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक; आरोपी फरार

Maharashtra Live News Update: वसईतील स्वघोषित भोंदू बाबावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT