Besharam Rang Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathan: 'चित्रपटावर बोलण्यापेक्षा देशातील समस्यांवर बोला...', 'बेशरम रंग' ची गायिका जरा स्पष्ट बोलली...

'बेशरम रंग' ची गायिका कॅरालीसा मोंटेरोने यावर आपली प्रतिक्रिया दिली असून तिने या गाण्यात स्पॅनिश बोल गायले आहेत.

Chetan Bodke

Pathan: सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण चित्रपट आगामी वर्षात जानेवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तब्बल चार वर्षांनंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर धूमधडाक्यात पुनरागमन करीत आहे. सध्या तरी चित्रपटातील पहिलेच गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

तोच नेटकऱ्यांनी गाण्यासह चित्रपटाला बॉयकॉट करण्याचे ठरवले आहे. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने घाललेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून भाजपा आणि हिंदू संघटना बऱ्याच आक्रमक झाल्या आहेत. काही ठिकाणी याविरोधात आंदोलनही करण्यात आलं आहे. जरीही हे गाणे नेटकऱ्यांकडून ट्रोल होत असले तरी ही आतापर्यंत गाण्याला अनेक व्ह्युज मिळाले आहेत.

मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी गाण्यावर आक्षेप घेत सर्व चूका सुधाराव्यात, अशी मागणी केली आहे. “ ‘पठाण’ हा चित्रपट दोषपूर्ण असून विषारी मानसिकतेवर चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने घातलेले भगवे आणि हिरव्या कपड्यांमध्ये निर्मात्यांनी बदल करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा मध्यप्रदेश राज्यात चित्रपटाचे प्रदर्शन होऊ द्यायचे की नाही याचा निर्णय आम्ही घेऊ.” असा इशारा खुद्द गृहमंत्री मिश्रा यांनी दिला आहे.

'बेशरम रंग' ची गायिका कॅरालीसा मोंटेरोने यावर आपली प्रतिक्रिया दिली असून तिने या गाण्यात स्पॅनिश बोल गायले आहेत. ती म्हणते, “शाळा शिकत असल्यापासून राष्ट्रध्वजातील भगव्या रंगाचा एकमात्र संबंध मला आठवतो, तो म्हणजे धैर्य आणि निस्वार्थीपणासाठी. मला माहिती नाही कोणत्या खासदाराने (मध्यप्रदेशचे गृहमंत्री) यावर आक्षेप घेतला आहे. पण, आपल्या देशात काल्पनिक चित्रपटात वापरण्यात आलेल्या कपड्यांच्या रंगापेक्षा देशात दुसऱ्याही गंभीर समस्या आहेत. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.” असं मत कॅरालिसा मोंटेरोने आपले स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

सध्या सोशल मीडियावर ' पठाण' चित्रपट बॉयकॉट करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर आता या चित्रपटाला आणखी किती बंदीची झळ सोसावी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेस आमदार असलम शेख यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन

Shahi Tukra Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी शाही टुकडा, वाचा सोपी रेसिपी

Smriti Mandhana Wedding: स्मृती मानधनाच्या वडिलांना हार्ट अटॅक, विवाहसोहळा रद्द

पुण्यात खळबळ! चिमुकल्या बहीण - भावाचा मृतदेह शेततळ्यात सापडला, बिबट्याचा हल्ला की आणखी काही?

Weekly Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT