Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. कधी त्यांच्या अभिनयाने तर कधी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांची अभिनयाची ओळख ही फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात कायम आहे. बिग बींना आपल्या दमदार अभिनय शैलीने अनेक नागरी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यातच आता आणखी एका भारतातल्या सर्वोच्च पुरस्काराची त्यांच्या पुरस्कार यादीत भर पडणार आहे.
सध्या पश्चिम बंगालमध्ये 'कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' सुरू आहे. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांसह अनेक दिग्गज मंडळी उपस्थिती लावत आहे. सोबतच काही 'हॉलिवूड' मधील कलाकारही या पुरस्कार सोहळ्याला आपली हजेरी लावत आहेत. नुकताच या पुरस्कार सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्यासह बिग बी अमिताभ बच्चनही उपस्थित होते. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक सर्वात मोठी घोषणा केली आहे.
या पुरस्कार सोहळ्याला डिसेंबरपासून सुरुवात झाली असून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाषणात बिग बींना 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळावा अशी मागणी केली.
या दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणतात, “अधिकृतरित्या नसले तरी आम्ही बंगालमधून अमिताभ बच्चन यांना भारतीय चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ दिलेल्या योगदानाबद्दल भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी करणार आहोत.” ही माहिती ANI ने ट्विट करत दिली आहे. यावेळी अनेक बॉलिवूड कलाकारांनी या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी पुरस्कार सोहळ्याला शाहरुख खान, राणी मुखर्जी, गायक अर्जित सिंग, ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन, अमिताभ बच्चन आदी कलाकार मान्यवर उपस्थित होते. सध्या सर्वत्र वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांची रेलचेल सुरु आहे. सध्या बरेच सेलिब्रिटीज अशा वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवात हजेरी लावताना दिसत आहेत. या चित्रपट महोत्सवाची सांगता २२ डिसेंबर रोजी होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.