Animal Day 4 Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Animal Day 4 Collection: बॉक्स ऑफिसवर ‘ॲनिमल’ची जादू; पठान, टायगर ३ ला मागे टाकत चौथ्या दिवशी केली घसघशीत कमाई

Animal Box Office Collection: समीक्षकांकडून चित्रपटाचे कौतुक झाले असले तरी, काही सीन्सवर नेटकरी नाराज आहेत. असं असलं तरी चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

Chetan Bodke

Animal Day 4 Box Office Collection

सध्या सर्वत्र ‘ॲनिमल’ चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटाला चाहत्यांकडून जितका संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. समीक्षकांकडून चित्रपटाचे कौतुक झाले असले तरी, काही सीन्सवर नेटकरी नाराज आहेत. असं असलं तरी चित्रपटाने तीन दिवसातच बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन आज चार दिवस झाले असून चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड पाहायला मिळत आहे. चला तर जाणून घेऊया चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईचा आकडा.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यंदाचा वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीमध्ये ‘ॲनिमल’ चित्रपटाचा समावेश झाला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करत अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर नोंदवले. पठान, गदर २ आणि टाइगर ३चे रेकॉर्ड मोडत ओपनिंगला सर्वाधिक कमाई करणारा ‘ॲनिमल’ बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. जरीही असं असलं तरी, चित्रपटाला पहिल्या विकेंडला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नुकतंच सॅकनिल्क या ट्रेड ॲनालिस्टने चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईचा आकडा चाहत्यांसोबत शेअर केली आहे. (Bollywood Film)

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, रश्मिका आणि रणबीरच्या ‘ॲनिमल’ने चौथ्या दिवशी ३९.९ कोटींची कमाई केली आहे. प्रदर्शानाच्या पहिल्या दिवशी ६३.८ कोटी, प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ६६.२७ कोटी, तिसऱ्या दिवशी ७१.४६ कोटी, चौथ्या दिवशी ३९.९ कोटींची कमाई केली आहे. असा एकूण पहिल्या चार दिवसात या चित्रपटाने २४१.४३ कोटींचा टप्पा गाठला आहे. तर जगभरामध्ये या चित्रपटाने चार दिवसात ४२५ कोटींचा टप्पा गाठला आहे.

दमदार ॲक्शन, उत्तम कथा, अफलातून व्हिएफएक्स आणि कलाकारांचा अभिनय असा मिलाप असलेल्या या चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रणबीर कपूरसह, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर आहेत. सर्वच कलाकारांच्या अभिनयाने आणि लूकने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. चित्रपटाची निर्मिती जवळपास १०० कोटींमध्ये झालेली असून पहिल्या दोन दिवसांच्या कमाईतूनच निर्मितीचा खर्च वसूल झाला आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

Pune Crime News : पुणे हादरलं !सासरवाडीत जाऊन पतीने केली पत्नीची हत्या; धक्कादायक कारण समोर

Shengdana Chikki: श्रावणात खास बनवा शेंगदाणा चिक्की, महिनाभर खाता येईल

Raigad To Arnala Fort: रायगड किल्ल्यावरून अर्नाळा किल्ल्यापर्यंत प्रवास कसा कराल? जाणून घ्या प्रमुख टप्पे आणि टिप्स

Nag Panchami 2025: नाग पंचमीला घरी पूजा कशी करावी?

SCROLL FOR NEXT