Charles Officer dies: वयाच्या ४८ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक चार्ल्स ऑफीसरने घेतला जगाचा निरोप, सिनेसृष्टीवर शोककळा

Charles Officer dies: प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक चार्ल्स ऑफिसरचे शुक्रवारी ४८ व्या वर्षी निधन झालं आहे. चार्ल्सचा मित्र, बिझनेस पार्टनर जेक यानोव्स्की यांनी दीर्घ आजाराने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.
Charles Officer dies
Charles Officer diesCBC
Published On

Charles Officer Passed Away:

प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक चार्ल्स ऑफिसरचे शुक्रवारी ४८ व्या वर्षी निधन झालं आहे. चार्ल्सचा मित्र, बिझनेस पार्टनर जेक यानोव्स्की यांनी दीर्घ आजाराने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. चार्ल्सच्या मृत्यूने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

चार्ल्सचं सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून वेगळी ओळख होती. चार्ल्सने कॅनडामधील वेगवेगळं जग मोठ्या पडद्यावर दाखवायचा. 'द पोर्टर' ही त्याची शेवटची कलाकृती ठरली. त्याने 12 कॅनेडियन स्क्रीन अवॉर्ड्स जिंकले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Charles Officer dies
Bhupendra Singh: 'काला टीका' फेम अभिनेत्याने केली तरुणाची हत्या, गोळीबारात तिघे जखमी

चार्ल्स ऑफिसरचा जन्म टोरंटोमध्ये झाला होता. त्याचे वडील ब्रिटीश आणि तर आई ही जमैकन होती. चार्ल्स डॉन व्हॅली शेजारच्या भागात वाढला होता. त्याने न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध नेबरहुड प्लेहाऊस स्कूल ऑफ द थिएटरमध्ये अभिनय आणि फिल्ममेकिंगचे धडे गिरवले.

त्याने 2008 मध्ये 'नर्स' या सीरीजचे दिग्दर्शन केले होते. त्याच्या या सीरीजची चाहत्यांमध्ये चर्चा होती. त्याने फायटर' आणि 'बॉय टेक प्लेस'चे सीरीजेचही दिग्दर्शन केलं आहे.

चार्ल्स ऑफिसरने सायकलींगमध्येही क्षेत्र गाजवलं आहे. यासोबत युरोपमध्ये प्रोफेशन हॉकी आणि ग्राफीक डिझाईनमध्येही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

'चार्ल्स ऑफिसरच्या निधनामुळे दु:ख झालं आहे. चित्रपट आणि कथााकथनामधील प्रभावी काम काळजाला स्पर्श करून जायचा. आम्हाला त्याचे अनेक चित्रपट सादर करण्याची संधी मिळाली. तसेच आम्हाला २०१३ मध्ये त्याचे टोरंटो ब्लॅक फिल्म फेस्टिवलमध्ये स्वागत करायला मिळाला. त्याचे चित्रपट, कला आम्हाला प्रेरणा देत राहील, अशी पोस्ट करत टोरंटो ब्लॅक फिल्म फेस्टिवलने चार्ल्सला श्रद्धांजली वाहिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com