Bhupendra Singh: 'काला टीका' फेम अभिनेत्याने केली तरुणाची हत्या, गोळीबारात तिघे जखमी

TV Actor Bhupendra Singh Arrested By Up Police: या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अभिनेता आणि त्याच्या नोकराला अटक केली आहे. तर दोघे जण फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
Bhupendra Singh
Bhupendra SinghSaam Tv

Bhupendra Singh Arrested:

उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टीव्ही अभिनेत्याने गोळ्या झाडून एका तरुणाची हत्या केली आहे. या गोळीबारामध्ये तिघे जण जखमी झाले आहेत. भूपेंद्र सिंह (Bhupendra Singh) असं या टीव्ही अभिनेत्याचे नाव आहे. ही घटना बिजनौरच्या बडापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुआखेडा खडरी गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अभिनेता आणि त्याच्या नोकराला अटक केली आहे. तर दोघे जण फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, कुआखेडा खडरी गावातील रहिवासी प्रीतम सिंग यांचा मुलगा भूपेंद्र सिंह याचे गावाला लागूनच शेरगड नावाचे फार्म हाऊस आहे. तर गुरदीप सिंह यांची या फार्म हाऊसजवळच शेतजमीन आहे. शेताच्या कडेला असलेले निलगिरीच्या झाडावरून भूपेंद्र सिंह आणि गुरदीप सिंह या दोघांमध्ये वाद सुरू होता. हे झाड कापण्यावरून या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता.

Bhupendra Singh
Mast Mein Rahne Ka Trailer: जॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ताचा 'मस्त में रहने का'चा ट्रेलर आऊट, राखी सावंतच्या लूकने वेधलं लक्ष

रविवारी या वादातूनच भूपेंद्र सिंहने आपल्या लायसन्स रिवॉल्वरने गोळीबार केला. या गोळीबारामध्ये गुरदीप सिंह यांचा २२ वर्षांचा मुलदा गोविंद सिंह याला गोळी लागल्यामुळे मृत्यू झाला. तर या गोळीबारामध्ये गुरदीप सिंह, त्यांची पत्नी मीराबाई आणि मुलगा अमरीक सिंह यांना गोळी लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली.

Bhupendra Singh
Academy Museum Gala मध्ये दीपिका पादुकोणचा जलवा, इव्हेंटमध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय अभिनेत्री

घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी झालेल्या तिघांनाही तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी गुरदीप यांच्या भावाने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी भूपेंद्र सिंह, त्याचा नोकर ज्ञान सिंह, जीवन सिंह आणि गुरजर सिंह यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भूपेंद्र आणि त्याचा नोकर ज्ञान सिंहला अटक केली. इतर दोघे फरार असून त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

Bhupendra Singh
Mudassar Khan Marriage: 'बॉडीगार्ड'च्या कोरिओग्राफरचं लग्न, रिसेप्शन पार्टीला हटके स्टाइलमध्ये पोहचला सलमान खान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com