Pune Crime News: व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला; चप्पल अन् इन्स्टाग्रामच्या मदतीने पोलिसांनी घेतला हल्लेखोराचा शोध

Pune News: पुण्यातील हडपसर येथे लष्कर पोलीस भागात पोलिसांनी आरोपीला थेट इन्स्टाग्रामच्या मदतीने अटक केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीची सर्वत्र चर्चा होताना दिसतेय.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV
Published On

Pune Crime:

चोर किंवा आरोपी व्यक्तीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीसांना अगदी छोटा क्यू मिळला तरी पुरेसा असतो. साध्या पुराव्यांच्या आधारे संशयाची सुई फिरवून पोलीस चोराचा शोध घेतात. अशात पुण्यातील हडपसर येथे लष्कर पोलीस भागात पोलिसांनी आरोपीला थेट इन्स्टाग्रामच्या मदतीने अटक केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीची सर्वत्र चर्चा होताना दिसतेय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Crime News
Dombivli Crime: शेजारचे दुकान भाड्याने घेतले, भितींला भगदाड पाडून ज्वेलर्सच्या दुकानात चोरी; तब्बल ७५ लाखांचा मुद्देमाल लंपास

नेमकं काय घडलं?

विजय विमलचंद मेहता हा व्यक्ती एक व्यावसायिक असून पुण्यातील लष्कर भागात सेंटर स्ट्रीट परिसरात त्याच्यावर कोयत्याने हल्ला झाला आहे. हल्ल्यात व्यावसायिक गंभिर जखमी झाल्याने याची पोलीस केस झाली. पुढे पोलिसांनी जलद गतीने तपासाची सूत्रे फिरवत आरोपीला ताब्यात घेतलं.

व्यावसायिकाचा पाठलाग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहता बंधूंचे सेंटर स्ट्रीटवर मेहता ज्वेलर्स दुकान आहे. काही दिवसांपूर्वी दोन हल्लेखोर विजयचा पाठलाग करू लागले. या व्यक्ती आपलाच पाठलाग करत असून आपल्या जीव धोक्यात असल्याचं विजयच्या पटकन लक्षात आलं. त्यामुळे त्याने स्वत:चा जीव वाचविण्यासाठी ‘स्टेप इन’ कपड्याच्या दुकानात धाव घेतली.

कोयत्याने हल्ला

हल्लेखोरांनी विजयला पळताना आणि त्या दुकानात लपताना पाहिलं होतं. दोघेही हल्लेखोर धावत दुकानात शिरले. त्यांनी विजयवर कोयत्याने वार केले. या घटनेत विजय गंभिर जखमी आणि रक्तबंबाळ झाला. उपस्थितांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

इन्स्टाग्रामवर सापडला फोटो

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले. तसेच संशयित आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस पंचनामा करताना त्यांना घटनास्थळी आरोपीची चप्पल आढळून आली होती. त्यामुळे पोलिसांनी संशयित आरोपींचे इन्स्टाग्राम अकाउंट तपासले. त्यापैकी एकाच्या पोस्टवर एकाच्या पायात तशीच आणि त्याच रंगाची चप्पल दिसली. त्यावरून इन्स्टाग्रामच्या मदतीने पोलिसांनी एका आरोपीला अटक केली.

Pune Crime News
Pimpri Chinchwad Crime: ट्रेलर चोरी करताना सापडला, बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू; तिघांना अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com