Dombivli Crime: शेजारचे दुकान भाड्याने घेतले, भितींला भगदाड पाडून ज्वेलर्सच्या दुकानात चोरी; तब्बल ७५ लाखांचा मुद्देमाल लंपास

Crime News: ज्वेलरी दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून सुमारे ७५ लाखांचे दागिचे चोरल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतून समोर आली आहे. बाजूचा गाळा भाड्याने घेऊन अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने ही चोरी केल्याचे उघड झाले आहे.
Dombivli  Crime News
Dombivli Crime NewsSaamtv
Published On

अभिजीत देशमुख, कल्याण| ता. १ डिसेंबर २०२३

Dombivli Crime News:

ज्वेलरी दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून सुमारे ७५ लाखांचे दागिचे चोरल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतून समोर आली आहे. बाजूचा गाळा भाड्याने घेऊन अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने ही चोरी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी डोंबिवली विष्णू नगर पोलिसांनी तपास सुरू केला. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, डोंबिवली पश्चिमेकडील (Dombivli) फुले रोड परिसरात रत्न सागर ज्वेलर्सचे दुकान आहे. या दुकानात भिंतीला भगदाड पाडून चोरट्याने 110 किलो चांदी आणि काही प्रमाणात सोन्याचे दागिने चोरले. चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध ही चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्न सागर ज्वेलर्सच्या शेजारीच असलेला गाळा काही तरुणांनी भाड्याने घेतला होता. हे तरुण झारखंड (Jharkhand) येथील राहणारे होते. त्यांनी भाड्याने घेतलेल्या गाळ्याबाहेर मोमोज तयार करण्याचा बोर्ड लावला होता. या दुकानातून शेजारच्या ज्वेलरी दुकानात चोरट्यांनी प्रवेश करत दागिने लंपास केले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dombivli  Crime News
Ajit Pawar News: 'दिलेला शब्द पाळला पाहिजे...' अजित पवारांचा जयंत पाटलांवर निशाणा; नेमकं काय म्हणाले?

ही घटना घडल्यानंतर चोरटे पसार झालेत असून विष्णू नगर पोलीस तपास करत आहेत. काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज परिसरातील एका ज्वेलर्स दुकानात देखील चोरी झाली होती. या घटनेतील आरोपी हे नेपाळमधील असल्याचे समोर आले होते. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारे दरोडा टाकल्याने सोने- चांदी व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. (Latest Marathi News)

Dombivli  Crime News
MNS News Pune: मराठी पाट्यांसाठी मनसेचं पुण्यात खळखट्याळ, JM रोडवरील दुकानांची तोडफोड; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com