Tanker Ban in Thane: डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात २ महिने टँकर बंदी; कारण काय? वाचा सविस्तर

Badlapur Latest News: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ,बदलापुरात टँकर वाहतुकीला बंद घालण्यात आली आहे.
Badlapur Latest News. File photos
Badlapur Latest News. File photosSaam tv
Published On

Thane tanker ban Latest news:

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ,बदलापुरात टँकर वाहतुकीला बंद घालण्यात आली आहे. टँकर वाहतूक बंदी ही १० नोव्हेंबर २०२३ ते ८ जानेवारी २०२३ पर्यंत राहणार आहे. या भागात येत्या १० नोव्हेंबरपासून सायंकाळी ६ वाजेपासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत टँकर वाहतुकीला बंदी राहणार आहे. (Latest Marathi News)

टँकर वाहतुकीला बंदी घालण्यासाठी राज्य सरकारच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या भागात औद्योगिक क्षेत्रामध्ये संध्याकाळी सहा वाजेपासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Badlapur Latest News. File photos
Ajit Pawar Health: जनतेपासून दूर रहावे लागणे त्रासदायक; अजित पवार पुन्हा एकदा विश्रांती घेणार

10 नोव्हेंबरपासून सायंकाळी सहा वाजेपासून ते सकाळी ६ वाजेदरम्यान टँकरमधून धोकादायक केमिकल वाहून नेऊन ते रात्रीच्या वेळी नदीच्या पात्रात सोडले जातात. त्यामुळे नदीचे पाणी प्रदुषित होते.

या प्रदुषित नदीच्या पाण्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ अन्वये डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ आणि बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्व प्रकारचे टँकरवर बंदी घालण्यात आली आहे.

Badlapur Latest News. File photos
NCP Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? उद्या होणार निवडणूक आयोगात सुनावणी

पोलीस उप आयुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ अन्वये डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये सांयकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व प्रकारचे टँकर वाहतूकीला बंदी घालण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com