The Legend Of Maula Jatt: फवाद खान आणि माहिरा खान मुख्य भूमिकेत असलेला 'द लीजेंड ऑफ मौला जट' या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला नसून पाकिस्तानमध्ये चित्रपट १३ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरात 220 कोटींची कमाई केली आहे. उत्कृष्ट कलेक्शनसह, हा चित्रपट केवळ पाकिस्तानमध्येच नाही तर युएई, अमेरिका आणि युरोपमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.
या चित्रपटाची कथा मौला जट नावाच्या स्थानिक नायकावर आधारित आहे. पाकिस्तानात याच नावाने पहिला चित्रपट बनला होता. चित्रपटाच्या कथेला ममदाल नावाच्या गावातच सुरुवात होते. या गावात मौला जाट कुटुंब राहतात. चित्रपटाचे निर्माते बिलाल लाशारी यांच्या चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशाने बरेच आनंदीत आहेत.
चित्रपटाचे निर्माते चित्रपटाविषयी बोलतात, 'चित्रपटाला जगभरातील प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मिळालेले प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. 'द लीजेंड ऑफ मौला जट'ने पाकिस्तानमध्ये बनवलेला चित्रपट जागतिक नकाशावर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, कारण तो जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकंत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.
हा चित्रपट भारतातही प्रदर्शित होऊ शकतो
हा चित्रपट भारतातही प्रदर्शित होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'द लीजेंड ऑफ मौला जट' भारतात 23 डिसेंबरला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. जरी याला अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी, दोन्ही देशांमधील राजकीय तणावानंतर 2019 नंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी फवाद खान आणि माहिरा खान यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. ते भारतातही बरेच लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांची 'हमसफर' ही प्रसिद्ध मालिकाही भारतात भरपूर हिट झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 'द लीजेंड ऑफ मौला जट' हा आतापर्यंतचा पाकिस्तानमधील सर्वात महागडा चित्रपट आहे. चित्रपट निर्मितीसाठी एकूण 100 कोटी इतके पाकिस्तानी रुपये खर्च झाले आहेत. आतापर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.