Shahrukh Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shahrukh Khan: शाहरुख खानला कस्टम अधिकाऱ्यांनी विमानतळावर रोखले, बॅगेत सापडली कोट्यावधींची घड्याळं

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि त्याच्या टीमला शुक्रवारी रात्री उशीरा सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर रोखले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ShahRukh Khan Mumbai Airport: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि त्याच्या टीमला शुक्रवारी रात्री उशीरा सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर रोखले. सुमारे तासाभराच्या चौकशीनंतर शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी विमानतळावरून बाहेर पडताना दिसले. पण किंग खानचा अंगरक्षक रवी आणि टीमला कस्टमने काही वेळेसाठी ताब्यात ठेवले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानचे लाखो रुपयांचे घड्याळ भारतात आणणे, बॅगेत महागड्या घड्याळांचे रिकामे बॉक्स सापडणे सोबतच कस्टम ड्युटी न भरल्याबद्दल शाहरुखची चौकशी करण्यात आली.

नेमकं काय घडलं?

शाहरुख खान त्याच्या टीमसह दुबईला त्याच्या खासगी चार्टर VTR-SG ने एका बुक लॉंचिंग कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता. काल रात्री साडेबारा वाजता या खाजगी चार्टर विमानाने तो मुंबईत परतला. रेड चॅनल ओलांडत असताना, सीमाशुल्क विभागाने शाहरुख खान आणि त्याच्या टीमच्या बॅगमध्ये लाखो रुपयांची घड्याळे सापडली.

यानंतर कस्टमने सर्वांना थांबवून बॅग तपासण्यात आली. तपासादरम्यान बॅगमध्ये अनेक महागडी घड्याळे, Babun & Zurbk घड्याळ, रोलेक्स घड्याळांचे 6 बॉक्स, Spirit ब्रँडची घड्याळे, ऍपल सिरीजचीही घड्याळे सापडली. चौकशीत घड्याळांचे रिकामे बॉक्स देखील सापडले आहेत. सीमाशुल्क विभागाने या घड्याळांचे मूल्यांकनही केले, त्यानंतर शाहरुखच्या त्या सर्व सामानांवर 17 लाख 56 हजार 500 रुपये इतका कस्टम ड्युटी लावण्यात आला.

यानंतर कोट्यवधी रुपयांच्या या घड्याळांवर लाखो रुपयांचा कर भरल्याची चर्चा होती. तासाभराच्या प्रक्रियेनंतर शाहरुख आणि पूजा ददलानी यांना विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली मात्र शाहरुख खानचा अंगरक्षक रवी आणि टीम सदस्यांना थांबवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवीने 6 लाख 87 हजार रुपये कस्टम भरले आहेत.

ज्याचे बिल शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवीच्या नावावर होते. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पैसे शाहरुख खानच्या क्रेडिट कार्डवरून भरण्यात आले आहेत. सीमाशुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त पुगल आणि युद्धवीर यादव यांनी ही संपूर्ण कारवाई केली. यानंतर शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवी याला सकाळी ८ वाजता सर्व प्रक्रिया पूर्ण करत सोडण्यात आले.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

Early Morning Dreams: सकाळी पडणारे स्वप्न खरंच पूर्ण होतात का?

SCROLL FOR NEXT