Shraddha Murder Cas Saam TV
मनोरंजन बातम्या

Shraddha Walker Case: श्रद्धा वालकरसारखा 'या' अभिनेत्रींनाही गमवावा लागला आपला जीव, प्रेमानेच केला घात

प्रियकराकडून विश्वासघात झालेली श्रद्धा पहिलीच नाही. याआधीही बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बहुचर्चित श्रद्धा वालकर खून प्रकरणाने सर्वांची झोप उडवली आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. मात्र, प्रियकराकडून विश्वासघात झालेली श्रद्धा पहिलीच नाही. याआधीही बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. एवढेच नाही तर या अभिनेत्रींमध्ये एक अशी अभिनेत्री आहे, जिच्या शरीराचे श्रद्धासारखे तुकडे करण्यात आले होते. वाचा या हृदय पिळवटून टाकणाऱ्या कथा...

शशिरेखा तमिळ टीव्हीवरील सुप्रसिद्ध अभिनेत्री

शशिरेखा ही तमिळ टीव्हीवरील सुप्रसिद्ध अभिनेत्री होती. परंतु तिच्या प्रेमानेच तिचा घात केला. शशिरेखा यांचे पती रमेश शंकर यांचे दुसऱ्या एका महिलेशी (व्यवसायाने अभिनेत्री) प्रेमसंबंध होते. दोघांच्या प्रेमात शशिरेखा अडथळा बनली होती. म्ह्णूनच या भीषण हत्येचा कट रचला गेला. अभिनेत्री शशिरेखाचा पती रमेश शंकर याने तिचा शिरच्छेद केला होता. रमेश शंकर आणि त्याच्या लिव्ह इन पार्टनरने शशिरेखाचे डोके दोन दिवस बाथरूममध्ये कोंडून ठेवले आणि संधी मिळताच मृतदेहाची विल्हेवाट लावली.

अभिनेत्री प्रिया राजवंश

अभिनेत्री प्रिया राजवंशचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हते. प्रियाच्या फिल्मी करिअरची सुरुवात नेत्रदीपक असली तरी तिचा शेवट मात्र भयानक होता. मालमत्तेसाठी चेतन आनंदच्या दोन्ही मुलांनी प्रियाची हत्या केली. शवविच्छेदन अहवालात प्रिया राजवंशचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

अभिनेत्री लैला खान

अभिनेत्री लैला खानच्या निधनाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तिची आई सेलिना पटेल यांनी तीन लग्न केली होती. लैला खानची आई सेलिना यांची मुंबईत करोडोंची संपत्ती होती. एके दिवशी लैला अचानक गायब झाली. लैलाच्या आईचा तिसरा नवरा परवेझ याने पैशासाठी संपूर्ण कुटुंबाची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर दीड वर्षांनी लैलाच्या कुटुंबीयांचे मृतदेह त्यांच्या फार्महाऊसमध्ये सापडले होते.

मीनाक्षी थापर

मीनाक्षी थापर यांच्या निधनाच्या बातमीने सर्वच हादरले होते. चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मीनाक्षीचे तिच्याच मित्राने अपहरण करून तिचा शिरच्छेद केला होता. मीनाक्षीचे आधी अभिनेता अमित जैस्वाल आणि त्याची मैत्रीण प्रीती सुरीन यांनी अपहरण केले आणि नंतर खंडणी मागितली. पण, खंडणी न मिळाल्याने आणि पोलिसांनी पाठलाग केल्यावर अमित आणि प्रीतीने तिला बेदम मारहाण केली. अलाहाबादमध्येच एका घराच्या पाण्याच्या टाकीतून पोलिसांना मीनाक्षी थापाच्या मृतदेहाचा खालचा भाग सापडला. लखनौ-अलाहाबाद सीमेवरील जंगलातून डोके जप्त करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: ५ दिवस झाले, अजूनही पीएम किसानचा हप्ता आला नाही? अशी करा तक्रार, लगेच येतील ₹२०००

Today Gold Rate : सोनं खरेदीचा विचार करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव; 24k, 22k च्या दरात मोठा बदल

Akola : अकोल्यात मोठी राजकीय घडामोड, नेत्याने शपथपत्रात चौथं अपत्य लपवलं, उमेदवारी रद्द होण्याची शक्यता

Maharashtra Live News Update : न्या. सुर्यकांत यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ

Tejas Fighter Jet Crash: दुबईमधील शोमध्ये घातपात? एअर शोदरम्यान भारतीय बनावटीचं तेजस MK1 कोसळलं कसं?

SCROLL FOR NEXT