Hansika Motwani Instagram @ihansika
मनोरंजन बातम्या

Hansika Motwani Wedding: तारीख आणि स्थळ ठरले; पण नवऱ्याचा पत्ता नाही, हंसिकाच्या लग्नाची जोरदार चर्चा...

हंसिकाचे लग्न मुंबईत होणार नसून तिचे लग्न जयपुरमध्ये होणार आहे. तिचे लग्न 4 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. तिच्या लग्नाची सर्व तयारी डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hansika Motwani Wedding: सध्या कलाकारांच्या लग्नाची सर्वत्रच चर्चा होत आहे. अलीकडेच रिचा चढ्ढा आणि अली फजल लग्नाच्या बंधनात अडकले. छोट्या पडद्यावरून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवणारी हंसिका मोटवानीही लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा होत आहे.

या वर्षा अखेरीस ही अभिनेत्री लग्न करणार असल्याची शक्यता आहे. हंसिका मोटवानीच्या अचानक लग्नाची बातमी तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करू शकते, परंतु तिचा पती कोण आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. हंसिका कोणासोबत लग्न करणार ? हे अद्याप कळलेले नाही

'शका लाका बूम-बूम' सारख्या लोकप्रिय शोमध्ये बालकलाकार म्हणून काम केलेल्या हंसिकाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री बनून आपले कौशल्य दाखवले आहे. तिने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. हंसिकाचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे. अल्लू अर्जुनसह अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलेली हंसिका डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

हंसिकाचे लग्न मुंबईत होणार नसून तिचे लग्न जयपुरमध्ये होणार आहे. तिचे लग्न 4 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. तिच्या लग्नाची सर्व तयारी डिसेंबरपासून सुरू होणार आहे. हे एक डेस्टिनेशन वेडिंग असेल, त्यावेळी सर्व जवळचे नातेवाईक उपस्थित असणार आहेत.

2 डिसेंबरला मेहंदीचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमात सुफी गाण्यांची मैफल रंगणार आहे. दुसऱ्या दिवशी संगीत विधीचे आयोजन करण्यात आले. असून एका वेगळ्या थीममध्ये हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. हंसिकाच्या लग्नाच्या कार्यक्रमाला वेगळ्या थीमसोबतच ड्रेस कोडही असण्याची शक्यता आहे. तिने आयोजित केलेल्या फंक्शन्समध्ये कॅसिनो थीम पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ती लग्नाच्यावेळी कोणता ड्रेस कोड देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हंसिका कोणासोबत लग्न करणार?

जयपूरमधील मुंडोटा फोर्ट आणि पॅलेसमध्ये हंसिकाचे लग्न होणार आहे. तिच्या पतीचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही, मात्र ती सोहेल कथोरिया नावाच्या व्यावसायिकासोबत लग्न करणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाकडून भाजपला 'दे धक्का', बड्या नेत्याचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शिंदेसेनेत प्रवेश

Printed Kurta Sets: कम्फर्टेबल फिटींग आणि स्टायलिश लूकसाठी आजच 'हे' प्रिंटेड कुर्ता सेट ऑर्डर करा

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

Election : यंदा गुलाल कुणाचा? पंचायत समिती सभापती, उपसभापतीचे आरक्षण जाहीर, वाचा यादी

Skin Care Tips: बटाटा त्वचेवर लावल्याने होतील 'हे' साइड इफेक्ट्स, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT