bollywood film the kashmir files 69th national award vivek agnihotri reaction saam tv
मनोरंजन बातम्या

69th National Film Awards Winners: ‘काश्मिर फाईल्स’ला राष्ट्रीय एकात्मतेसाठी पुरस्कार, विवेक अग्निहोत्री आनंद व्यक्त करत म्हणाला...

69th National Film Awards:‘६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ जाहीर होताच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आनंद व्यक्त केल आहे.

Chetan Bodke

69th National Film Awards Winners

मनोरंजनसृष्टीमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ घोषणा करण्यात आली आहे. आज अर्थात २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटानं यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये दोन पुरस्कार पटकावले आहेत. पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती कळताच या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आनंद व्यक्त केल आहे. सोबतच दिग्दर्शकांनी हा पुरस्कार काश्मीरमधल्या दहशतवादाच्या पीडितांना अर्पण केला आहे.

‘६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’मध्ये ‘द काश्मिर फाईल्स’ला उत्कृष्ट राष्ट्रीय एकात्मता ‘नर्गिस दत्त’ चित्रपट पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून पल्लवी जोशी यांनी पुरस्कार पटकावला आहे. यानंतर अग्निहोत्री यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भावना व्यक्त करताना दिग्दर्शक म्हणाले, “मी सध्या अमेरिकेत आहे आणि मला परदेशात असताना, सकाळी सकाळीच आनंदाची बातमी मिळाली की, काश्मिर फाईल्सला भारताचा ६९वा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार भारतातील सर्वात मानाचा पुरस्कार आहे.”

“मी नेहमीच सांगतो की, हा ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपट माझा नाही. काश्मीरमध्ये दहशतवादाचे बळी गेलेले हिंदू, शीख, मुस्लिम, ख्रिश्चन, दलित, गुज्जर असलेल्यांचा हा आवाज चित्रपटात आहे. मी एक चित्रपटासाठी माध्यम म्हणून होतो. हा आवाज संपूर्ण जगात पोहोचलेला आहे. दिवसरात्र मेहनत करुन या चित्रपटाला जगभरात पोहोचवलं आहे. आता या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. हा पुरस्कार मी आमच्या निर्मिती कंपनीकडून त्या सर्व पीडितांना अर्पण करतो, जे दहशतवादाचे पीडित आहेत. खासकरुन काश्मिरी हिंदू. तसेच जगभरात कोणताही भारतीय दहशतवादाचा पीडित असेल हा चित्रपट त्यांचा आवाज आहे.” त्यांचं दुःख आहे, असंही विवेक अग्निहोत्री यांनी म्हटलंय.

६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज, गुरुवारी झाली. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटामध्ये 'सरदार उधम'ने बाजी मारली तर आलिया भट्ट आणि क्रिती सेनन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये पुष्पाचा जलवा बघायला मिळाला. अल्लू अर्जुन सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मानकरी ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT