Singham Again saam tv
मनोरंजन बातम्या

Singham Again : 'सिंघम अगेन'च्या कमाईत मोठी घट; सात दिवसांचं कलेक्शन किती झालं? वाचा

Singham Again box office collection : दिवाळीत प्रदर्शित झालेला 'सिंघम अगेन'च्या कमाईत मोठी घट झालेली पाहायला मिळाली. बॅाक्स ऑफिसवर 'भूल भूलैया 3' सिनेमाने 'सिंघम अगेन'ला मागे टाकत आघाडी घेतली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अजय देवगणचा 'कॅाप युनिवर्स'चा सिंघम अगेन सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र, सुरुवातीला कमाईचा जोर धरलेल्या या चित्रपटाला 'भूल भूलैया 3' सिनेमाने मागे टाकलं आहे. यामुळे 'सिंघम अगेन' सिनेमा कमाईच्या बाबतीत मागे पडला आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज झाला आहे. गेल्या वर्षापासून प्रदर्शित होण्यापासून रखडलेला चित्रपट अखेर १ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'सिंघम अगेन'ने पहिल्या दिवशी बॅाक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली. मात्र, काही दिवसातच बॅाक्स ऑफिस कलेक्शनमध्ये घट झाल्याचं चित्र दिसत आहे. चित्रपटाने 'ओपनिंग डे'ला जबरदस्त कमाई करत सगळ्यांना चकित केले. कमाईसाठी चित्रपटासाठी दिवाळीच्या सुट्ट्या फायदेशीर ठरल्या.

अजय देवगणच्या करिअर मधला हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठी ओपनिंग देणारा चित्रपट ठरला आहे. प्रेक्षकांना देखील चित्रपट भरपूर आवडल्याचा दिसून आलं. 'सिंघम अगेन'च्या सोबतच 'भूल भूलैया ३' हा सिनेमागृहात रिलीज झाला. त्यातच आता 'सिंघम अगेन'च्या बॅाक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. 'ओपनिंग डे'नंतर सलग बॅाक्स ऑफिस कलेक्शनमध्ये घसरण होताना दिसत आहे. तर, सातव्या दिवसाची कमाई ही केवळ ८.७५ कोटींवर येऊन थांबली.

'भूल भूलैया 3' आणि 'सिंघम अगेन' थिएटरमध्ये क्लॅश

मल्टिस्टारर सिंघम अगेन आणि कार्तिक आर्यनचा 'भूल भूलैया 3' हे दोन्ही चित्रपट सिनेमागृहात १ नोव्हेंबरला आमनेसामने होते. अजय आणि कार्तिकच्या चित्रपटामध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी 'भूल भूलैया 3' सिनेमाला मागे टाकत 'सिंघम अगेन'ने भरारी घेतली आणि ४३.५ कोटीची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी ४२.५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ३५.७५ कोटींची कमाई केली.

सॅकनिल्क (SACNILK) च्या अहवालानुसार,अजय देवगणच्या चित्रपटाला सातव्या दिवशी ८.७५ कोटींचा गल्ला जमवण्यात यश आलं. अशातच 'सिंघम अगेन'ची एकूण कमाई १७३.०० कोटी झाली आहे. ३५० कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. आतापर्यंत, संपूर्ण सिनेमच्या बजेटची निम्मी रक्कम वसूल करण्यात यश आलं आहे.

मात्र, दुसरीकडे 'भूल भूलैया 3' सिनेमाने सातव्या दिवशी ९.५० कोटीची कमाई केली. त्या सिनेमाने 'सिंघम अगेन'ला मागे टाकत कोटींची कमाई करण्यात यशस्वी ठरली आहे. 'भूल भूलैया 3' या चित्रपटाचं बजेट १५० कोटी होते. गुरुवारपर्यंतच्या आकड्यांनुसार 'भूल भूलैया 3' सिनेमाने आतापर्यंत १४८.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. यावरुन दिसून येते की, सिनेमागृहात 'सिंघम अगेन' चांगलाच आपटला आहे.

सिंघम , सिंघम २, सिंबा आणि सूर्यवंशी या चित्रपटानंतर सिंघम अगेन रोहित शेट्टीच्या 'कॅाप युनिवर्स'मधील हा पाचवा सिनेमा आहे. या चित्रपटात अजय देवगणसह अक्षय कुमार, रणवीर सिंह, करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, टाइगर श्रॅाफ, आणि जॅकी श्रॅाफ सारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहे.

Edited by : Priyanka Mundinkeri

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT