Rocky Aur Rani Ki Prem Kahani Trailer Shared Twitter
मनोरंजन बातम्या

बहुचर्चित ‘Rocky Aur Rani Ki Prem Kahani’ पाहिली का?; कॉमेडी, ड्रामा आणि इमोशन्सने भरलेला ट्रेलर प्रदर्शित

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Trailer Out: करण जौहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Chetan Bodke

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Trailer Shared: करण जौहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर टीझर आणि एका रोमँटिक गाण्याने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून चित्रपटात मुख्य भूमिकेत आलिया भट्ट, रणवीर सिंग, धर्मेंद्र, जया बच्चन अशी तगडी कास्ट पाहायला मिळत आहे.

रणवीर-आलियाची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. याआधी हे दोघे 'गली बॉय' या चित्रपटात एकत्र दिसले होते. चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये खूप चर्चा आहे. जया बच्चन,धर्मेंद्र या दिग्गज कलाकारांना खूप दिवसांनी मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. धर्मा प्रोडक्शन निर्मित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट २८ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटात रॉकी रंधावा (रणवीर सिंग) आणि राणी (आलिया भट्ट) यांची कथा चित्रित करण्यात आली आहे. चित्रपटाच्या कथेत दोघांचीही पार्श्वभूमी वेगवेगळी आपल्याला दिसते. परंतु त्या दोघांनाही प्रेम जवळ आणतं. राणी एक हुशार आणि सुशिक्षित मुलगी आहे.

तर, रॉकी नेहमाच हसत- खेळत राहणारा पंजाबी मुंडा आहे. पहिल्या भेटीत सुरू झालेली त्यांची प्रेमकहाणी लग्नापर्यंत पोहोचते की नाही, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. दोघांचेही कुटुंबिय त्यांना लग्न करण्याची परवानगी देणार का?, जर लग्न करून नाही दिलं तर काय पाऊल उचलणार या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर, चित्रपट येत्या २८ जुलै २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मुख्य भूमिकेत रणवीर सिंग, आलिया भट्ट सोबत शबाना आझमी, धर्मेंद्र,जया बच्चन आणि मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग देखील या चित्रपटात दिसणार आहे.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून करण जोहर तब्बल सात वर्षांनी दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘ए दिल है मुश्कील’ हा चित्रपट करणचा अखेरचा दिग्दर्शित केलेला चित्रपट ठरला. इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT