Thalapathy Vijay Join Politics: रुपेरी पडद्यावर सध्या दाक्षिणात्य कलाकारांची फारच चलती आहे. कलाकारांप्रमाणेच चित्रपटाची चर्चा देखील होते. दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजयच्या अभिनयाची देखील नेहमीच चर्चा होत असते. त्याच्या चाहत्यांची संख्या देखील बरीच मोठी संख्या आहे. विजय एका चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन देखील घेतो.
गेल्या काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या यादीत त्याचा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत समावेश झाला आहे. सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता लवकरच सिनेसृष्टीत काही वर्षांचा ब्रेक घेणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. २०२६ मध्ये तो काही तरी मोठा धमाका करणार असल्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
सध्या अभिनेता ‘लिओ’ चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. अभिनेत्याविरोधात ‘ना रेडी’ विरोधात चेन्नईतील एका सामाजिक कार्यकर्त्याने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी विजय राजकारणातून ब्रेक घेणार अशी चर्चा सुरू होती. पण आता त्याच निमित्त एक नवीन अपडेट समोर आली आहे.
विजय ‘लिओ’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो सिनेसृष्टीतून काही वर्षांचा ब्रेक घेणार आहे. कारण, त्याला २०२६च्या निवडणुकीची तयारी करायची आहे. तामिळनाडूच्या निवडणुकीसाठी विजयच्या चाहत्यांची एक संस्था तयार होत असल्याची सध्या चर्चा होत आहे. अभिनेता पुन्हा निवडणुकीनंतर सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्सने दिली आहे.
इंडिया टुडे या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, २०२४ पर्यंत तो सर्व आपली काम आटोपणार असून लोकसभा निवडणुकीनंतर तो स्वतःचा पक्ष तो तयार करणार आहे. त्या पक्षामार्फतच तो २०२६ची तामिळनाडू निवडणूक अभिनेता लढवणार आहे. ‘ऑल इंडिया थलपती विजय मक्कल इय्यकम’ असं त्याच्या चाहत्यांनी तयार केलेल्या संघटनेचे नाव आहे. या मार्फत तो अनेक समाज उपयोगी उपक्रम, सामाजिक उपक्रम तो राबविण्याचे काम करतो. या संघटनेचे सर्वच जिल्ह्यात सदस्य असून संघटनेसह अभिनेत्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
२०२२ ला या संघटनेने शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवल्या होत्या. २०२६ च्या निवडणुकीत स्टॅलिन यांच्या पक्षाला आवाहन देणार का अशी चर्चा सुरू आहे. अद्याप या संस्थेकडून किंवा अभिनेत्याकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.