Famous Producer Death  saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Producer Death : तेजस्वी तारा हरपला! ज्येष्ठ निर्मात्याचे निधन, मुंबईतल्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Famous Producer Passes Away : अनेक बॉलिवूड अभिनेत्यांना स्टार बनवणारे ज्येष्ठ निर्मात्याचे निधन झाले आहे. वयाच्या 76 व्या वर्षी पहलाज निहलानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Shreya Maskar

ज्येष्ठ निर्माते पहलाज निहलानी यांचे निधन

वयाच्या 76 व्या वर्षी निर्मात्याने घेतला अखेरचा श्वास

मनोरंजनसृष्टी शोकसागरात बुडाली

ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (CBFC) माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे आज (४ जून २०२६) रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वयाच्या 76 व्या वर्षी पहलाज निहलानी यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून पहलाज निहलानी यांच्यावर श्रद्धांजली वाहिली आहे.

IANS च्या वृत्तानुसार, पहलाज निहलानी यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 'लिव्हर सिरोसिस' (यकृताचा विकार) झाल्याचे निदान झाले होते. गेल्या चार महिन्यांपासून ते या आजाराने त्रस्त होते.पहलाज निहलानी यांच्या पश्चात त्यांची पत्नी नीता आणि त्यांचे तीन मुलं आहे. ज्यांची नावे दीपेश, विशाल आणि चिराग अशी आहेत. पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर ४ जून दुपारी ३ च्या आसपास अंत्यसंस्कार होणार आहेत.

पहलाज निहलानी कोण होते?

पहलाज निहलानी यांनी 'असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्यूसर्स'मध्ये जवळपास तीन दशके सेवा बजावली. १९८२ साली रिलीज झालेला 'हाथकडी' हा त्यांचा पहिला निर्मिती केलेला चित्रपट होता. त्यांचा दुसरा चित्रपट 'आंधी तूफान' १९८५ मध्ये आला. १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इल्झाम'मधून अभिनेता गोविंदाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर १९८७ 'आग ही आग' या चित्रपटाद्वारे चंकी पांडेने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. पहलाज निहलानी यांनी 'शोला और शबनम' आणि डेव्हिड धवन दिग्दर्शित 'आँखें' यांसारख्या चित्रपटांचीही निर्मिती केली.

२००८ ला रिलीज झालेल्या 'हल्ला बोल' या चित्रपटात पहलाज निहलानी यांचा कॅमिओ होता. जानेवारी २०१५ मध्ये त्यांनी CBFC च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. २०१९ मध्ये रिलीज झालेला 'रंगीला राजा' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये राष्ट्रवादी बंडखोर साजिद बेग यांची निवडणुकीतून माघार

कराडकरांना Good News; मुंबई-कोल्हापूरचा प्रवास सुसाट होणार

Virat Kohli injury: टीम इंडियाला मोठा झटका; अफगाणिस्तान सिरीजपूर्वीच विराट कोहली बाहेर, काय आहे कारण?

Accident News : मुंबईत भीषण अपघात! बेस्ट बसची उभ्या कारला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

शरीराच्या 'या' भागाचे दुखणं सांगेल तुम्हाला डायबिटीज आहे! रक्तातील साखर वाढल्यास दिसतात 'ही' ८ लक्षणे

SCROLL FOR NEXT