Pathaan Movie Poster  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathaan: 'पठान' दिसणार नव्या रुपात, निर्मात्यांनी दिली खास माहिती; बॉक्स ऑफिस कमाईसाठी नवी स्ट्रेटेजी?

'दुधाने तोंड भाजल्यावर ताकही फुंकून पितात' हा वाक्प्रचार नक्कीच सर्वांना माहित असेल. सध्या अशी गत शाहरुखच्या 'पठान' चित्रपटाची आहे.

Chetan Bodke

Pathaan: 'दुधाने तोंड भाजल्यावर ताकही फुंकून पितात' हा वाक्प्रचार नक्कीच सर्वांना माहित असेल. एखाद्या व्यक्तीला दुखापत झाल्यावर तो जरा जपूनच चालतो. सध्या अशी गत शाहरुखच्या 'पठान' चित्रपटाची आहे. चित्रपटातील पहिल्या गाण्याला मिळालेला प्रतिसाद पाहता निर्माते जरा विचारपुर्वकच पुढील पाऊल टाकणार आहेत. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली प्रदर्शनाची तारीख पाहता अजूनही चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालेला नाही.

चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे इतके ट्रोल झाले असले तरी गाण्यांना नेटकऱ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे.

चित्रपट जगतातील तज्ञांच्या मते, एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर चित्रपट प्रदर्शनाच्या किमान तीन आठवडे आधी प्रदर्शित व्हायला हवा. गाण्यावर झालेल्या वादानंतर निर्माते ट्रेलरमध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाण्यांमुळे ट्रेलर थोडा उशीरा प्रदर्शित करु शकतात. कदाचित चित्रपटाचा ट्रेलर नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित करु शकतात. सध्या प्रेक्षक नववर्ष आणि ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये व्यग्र आहेत, तर हा सुद्धा विचार करत ट्रेलर प्रदर्शनासाठी उशीर होऊ शकतो.

सध्या शाहरुख आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असून त्याने रविवारी सोशल मीडियावर 'AskSRK' नावाचा एक क्विझ ठेवला होता. त्यात त्याने अनेक मजेशीर उत्तरं दिली आहेत. यामध्ये त्याला 'चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार' असा प्रश्न विचारला असता,

त्यावर शाहरुख म्हणतो, 'हो मला खूप इच्छा आहे, लवकरच चित्रपटाचा ट्रेलर तुम्हाला पाहायला मिळणार आहे.' अनेक जणांनी त्याला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारले. तर काही मजेशीर प्रश्न ही त्याला विचारण्यात आले होते.

शाहरुख खानचा 'पठान' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच सोशल मीडियावर त्याची चर्चा होत आहे. चार वर्षांनंतर शाहरुखचे मोठ्या पडद्यावर पुनरागमन होत असल्याने प्रेक्षक शाहरुख आणि दीपिका पदुकोण यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर अद्याप प्रदर्शित झाला नसला तरी प्रेक्षकांना यात उत्तम अॅक्शन सीन्स पाहायला मिळतील असा निर्मात्यांचा दावा आहे.

आता या चित्रपटाचा अनुभव प्रेक्षकांसाठी अधिक प्रेक्षणीय होणार आहे, कारण हा चित्रपट ICE थिएटर स्वरूपात प्रदर्शित होणार आहे. या फॉरमॅटमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला भारतीय चित्रपट असेल. सध्या तरी चित्रपट निर्मात्यांनी ही माहिती नुकतीच शेअर केली आहे.

चित्रपट निर्माते म्हणतात, “प्रेक्षकांना चित्रपटाचा उत्तम अनुभव देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा नेहमीच आम्ही वापर करतो. प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा अनुभव देण्यासाठी 'पठान' हा ICE फॉरमॅटमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट असेल हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे."

सोबतच लक्षणीय बाब म्हणजे, "ICE थिएटर फॉरमॅटमध्ये साइड पॅनेल्स असतात, जे मुख्य स्क्रीनला जोडलेले असतात, ज्यामुळे चित्रपटाचा अनुभव वेगळाच मिळतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर, डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस, द बॅटमॅन आणि फॅन्टास्टिक बीस्ट्स: द सीक्रेट ऑफ डंबलडोर यासारखे अनेक हॉलिवूड चित्रपट ICE फॉरमॅटमध्ये प्रदर्शित झाले आहेत."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

"दीदी, मला मदतीची गरज" दहावीच्या मुलीचा पुणे पोलिसांना फोन, पुढे काय झालं तुम्हीच पाहा

Anagha Atul: भरपावसात साडी नेसून अनघा अतुलचं बोल्ड फोटोशूट, Photos

Pune PMC News : पुण्यातील नामांकित 'जोशी' पुलावर घाणीचे साम्राज्य, महापालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप

Healthy liver color: निरोगी लिव्हरचा रंग कसा असतो?

SCROLL FOR NEXT