Akshay Kumar: केबीसीच्या सेटवर अक्षयने महिलांना दिला नवा कानमंत्र, सेल्फ डिफेन्ससाठी नवा पर्याय...

बिग बी अमिताभ बच्चन होस्ट करत असलेले 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम नेहमी चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतो.
Akshay Kumar
Akshay Kumarinstagram @akshaykumar
Published On

Akshay Kumar: बिग बी अमिताभ बच्चन होस्ट करत असलेले 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम नेहमी चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतो. या कार्यक्रमात सामान्य व्यक्तींपासून अनेक दिग्गज कलाकार मंडळीही उपस्थिती लावतात. अनेकदा बॉलिवूडच्या दिग्गज कलाकार मंडळींनी या कार्यक्रमाला आपली हजेरी लावली होती. सोबतच ते त्यांच्या चित्रपटांचेही प्रमोशन त्या कार्यक्रमात करत असतात. या कार्यक्रमाला यावेळी अक्षय कुमारने हजेरी लावली आहे.

Akshay Kumar
Instagram Reels Star : तुनिषानंतर आणखी एका स्टारने संपवलं जीवन; घराच्या गच्चीवर आढळला मृतदेह

अक्षयने (Akshay Kumar) या कार्यक्रमाला कोणत्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली नव्हती. त्यावेळी अक्षय या कार्यक्रमात येऊन महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देताना दिसणार आहे. 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Cororepati) या कार्यक्रमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. त्या टीझरमध्ये, बिग बी अक्षय कुमारला सांगतात की, तो महिलांना स्वसंरक्षण कसं करावे याचं ज्ञान देऊ शकतो का? यावेळी त्याने बिग बींची विनंती मान्य करत महिला वर्गाला स्वसंरक्षण कसे करावे याचे धडे दिले.

Akshay Kumar
Abhijeet Bichukale : शाहरुख खानचा पठाण सिनेमातील लूक माझ्यासारखाच; अभिजीत बिचुकलेचा मोठा दावा

यावेळी अक्षय म्हणतो, " तुम्हाला कदाचित हसू येईल, पण जोरजोरात ओरडणे सगळ्यात सोपा आणि महत्वाचा उपाय समजला जातो. अक्षयनं या टेक्निकला एका महिलेसोबत प्रॅक्टिकली करुनही पाहिलं. प्रेक्षकांना दाखवण्यासाठी अक्षय जसा त्या महिलेच्या दिशेनं चालू लागतो, तेव्हा ती जोरजोरात ओरडू लागते. अक्षयनं सर्वच महिलांना स्वसंरक्षणासाठी ही प्राथमिक टेक्निक उपयोगात आणण्याचा सल्ला दिला आहे." (Women Self Defiance)

Akshay Kumar
Bigg Boss Marathi 4: गादीवर अंडी फोडल्याने अक्षय राखीवर भडकला, म्हणाला 'या घरात तू एवढी महत्त्वाची नाहीस ...'

'कौन बनेगा करोडपती'च्या मंच्यावर महिलांना सेल्फ डिफेंस धडे देताना अक्षय पुढे म्हणतो, " सेल्फ डिफेन्सची आणखी एक पद्धत म्हणजे निरिक्षण. तुम्ही जर रात्रीचे कुठे जात असाल किंवा शांत ठिकाण असलेल्या परिसरात जात असाल तर तिथे अलर्ट असणं फार महत्वाचा आहे. तुम्ही जिथे चालत आहेत, तिथे जवळपास दरवाजा आहे की खिडकी, कुठे काही पडलं आहे का?, सोबतच आपल्या आजुबाजूच्या सगळ्या वस्तूंचं निरिक्षण करायला शिकलं पाहिजे."

Akshay Kumar
Salman Khan : सलमानला शुभेच्छा द्यायला आलेल्या चाहत्यांची गर्दी अनियंत्रित; पोलिसांना करावा लागला लाठीमार

दरम्यान 'कौन बनेगा करोडपती'च्या मंच्यावर महिलांना सेल्फ डिफेंसचे धडे देताना शांतता पसरली होती. सर्वच महिला प्रेक्षक त्याचे धडे एकचित्ताने ऐकत होते. अक्षयनं महिलांना दिलेले सेल्फ डिफेन्सचे धडे ते नक्कीच सगळ्या महिलांना कामी येईल.

अक्षयचे २०२२ या वर्षातील चित्रपटांची कमाई पाहता इतकी दिलासादायक नव्हती (Bollywood Film). अक्षय कुमार लवकरच 'सेल्फी' सिनेमात दिसणार आहे. सोबतच अक्षय गोरखा सिनेमातही दिसणार आहे. त्याचे आता तरी हे बाकीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Box Office Collection)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com