Bigg Boss Marathi 4: गादीवर अंडी फोडल्याने अक्षय राखीवर भडकला, म्हणाला 'या घरात तू एवढी महत्त्वाची नाहीस ...'

अक्षय केळकरचा राखीवर आरोप, आता घरामध्ये होणार नवा वाद.
Rakhi Sawant and Akshay Kelkar
Rakhi Sawant and Akshay Kelkar Saam Tv

Bigg Boss Marathi Update: 'बिग बॉस मराठी सीजन ४'चे आता शेवटच्या काही दिवस उरले आहेत. आता बिग बॉसच्या घरामध्ये ७ स्पर्धक आहेत. हे सात स्पर्धक घरावर राज्य करत आहेत. असे असले तरी या सात स्पर्धकांमध्ये खूप वाद होत असतात. आजच घरामध्ये पाहायला मिळणार वाद नवीन नसला तरी वेगळा आहे.

'बिग बॉसचा ४'च्या घरातील या आठवड्याचा कॅप्टन आरोह वेलणकर आहे. त्याला घरातील सदस्यांचा विरोध आहे. कारण टास्कदरम्यान झालेला गोंधळामुळे स्पर्धकांची विजेतेपदाची रक्कम कमी झाले आहे. त्यावरून घरामध्ये अजूनही वाद होत आहेत.

Rakhi Sawant and Akshay Kelkar
Milind Soman: मिलिंद सोमणचे ८ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन, पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका

कालच्या भागात किरण माने, आरोह वेलणकर, अपुर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर हे सेफ झाले असून फिनालेमध्ये त्यांचा प्रवेश झाला आहे. 'वाघोबा आला रे आला' उभा कार्यात राखी सावंत, प्रसाद जवादे आणि अमृता धोंगडे घराबाहेर जाण्याच्या नॉमिनेट झाले आहेत. गेल्या आठवड्यात वोटिंग लाईन्स बंद होत्या. त्यामुळे सातही स्पर्धक सेफ झाले होते. (Celebrity)

आज बिग बॉसच्या घरामध्ये काय घडणार याची सर्वांच उत्सुकता असेल. कलर्स मराठीच्या सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की अक्षयच्या बेडवर कोणीतरी अंड फोडून ठेवत. अक्षय याविषयी सर्वांना विचारतो. अक्षय थेट राखीवर आरोप करतो. यावरून त्यांच्यामध्ये वाद होतो. (Bigg Boss Marathi)

अक्षय गेल्यावर जेवण करत असताना राखी म्हणते मला माहित आहे कोणी केलाय ते? मी पाहिलं आहे हे कोणी केलं ते? राखीच्या या बोलण्याने घरातील सर्व सदस्य चकित होतात. आहे ते कृत्य कोणी केलं याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल? आता अक्षय या अंड्याच्या प्रकरणावरून काय करणार आणि घरत आणखी काय राडे होणार हे आपल्याला येणाऱ्या भागात पाहत पाहायला मिळणार आहेत.

'बिग बॉस मराठी ४' आता काहीच दिवस राहिले आहेत. या परवाच विजेता किंवा विजेती कोण ठरणार याची सर्व प्रेक्षकांना उत्सुकता आहे. फॅमिली वीकनंतर ही उत्सुकता अजूनच वाढली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com