Yash: यशला 'मन मै हैं विश्वास', आगमी वर्षात टॉलिवूडचीच हवा...

2022 या वर्षात बॉलिवूडचे अनेक चित्रपट फ्लॉप होत दाक्षिणात्य चित्रपटांनी कोट्यावधींची कमाई केली आहे.
Yash
YashSaam Tv
Published On

Yash: 2022 या वर्षात बॉलिवूडचे अनेक चित्रपट फ्लॉप होत दाक्षिणात्य चित्रपटांनी कोट्यावधींची कमाई केली आहे. बॉलिवूडचे इतके चित्रपट फ्लॉप होण्यामागचे कारण अनेक दिग्दर्शकांनी आणि काही कलाकारांनी दिले होते. काही बॉलिवूड चित्रपटांनीच बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कमाई केली. तरीही या वर्षात टॉलिवूडच सर्वश्रेष्ठ होता.

Yash
Akshay Kumar: केबीसीच्या सेटवर अक्षयने महिलांना दिला नवा कानमंत्र, सेल्फ डिफेन्ससाठी नवा पर्याय...

या वर्षात दाक्षिणात्य चित्रपटांनी केलेली कमाई पाहता, दाक्षिणात्य चित्रपटांचे प्रेक्षकांवरील वर्चस्व पाहता यावर केजीएफ स्टार यशची प्रतिक्रिया कमालीची चर्चेत आली आहे. त्याला एका मुलाखतीत येत्या आगामी वर्षात कोणते चित्रपट सर्वाधिक चालणार असे विचारले होते. अनेक टॉलिवूड कलाकारांनी बॉलिवूडला लक्ष्य करत आपल्याच भाषेतील चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला होता. (Tollywood)

Yash
Instagram Reels Star : तुनिषानंतर आणखी एका स्टारने संपवलं जीवन; घराच्या गच्चीवर आढळला मृतदेह

महेश बाबुला बॉलिवूड मधून अनेक ऑफर आल्या होत्या, पण तरीही त्या नाकारत त्याने टॉलिवूड मध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बराच कोट्यवधींचा गल्ला जमवला होता. त्या तुलनेत बॉलिवूडच्या काहीच चित्रपटांनी दिलासादायक कमाई केली होती.

Yash
Abhijeet Bichukale : शाहरुख खानचा पठाण सिनेमातील लूक माझ्यासारखाच; अभिजीत बिचुकलेचा मोठा दावा

भारतीय चित्रपटसृष्टीत दाक्षिणात्य चित्रपटांचा वाढता दरारा पाहता बॉलिवूडलाच ते मोठे जिव्हारी लागण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सलमान, अमिर आणि आदींनी येत्या आगामी काळात आपल्याला चित्रपटावर काय काम करावे लागणार यावर आपले मत मांडले होते. त्यातच आता यशनेही आपले मत मांडले आहे.

Yash
Salman Khan : सलमानला शुभेच्छा द्यायला आलेल्या चाहत्यांची गर्दी अनियंत्रित; पोलिसांना करावा लागला लाठीमार

तो म्हणतो, "मला वाटतं येत्या वर्षात ही दाक्षिणात्य चित्रपटच दमदार कमाई करतील. पूर्वी आम्ही फारसे ॲक्टिव नव्हतो, तर आम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी इतकी खास संधी नव्हती. आता मिळतेय तर त्याचा अभिमान आहे. आम्हाला लक्ष्य गाठायचे आहे, जे आम्ही सर्वांनी एकत्र येत ठरवले आहे. प्रेक्षकांची ही साथ आहे."

सोबतच तो पुढे म्हणतो, " आमची फिल्म इंडस्ट्री किती महान आहे, हे सिद्ध करण्याची ही वेळ आहे. त्यामुळे आता काहीही झालं तरी स्वतःला सिद्ध करणारच." असा निर्धार त्याने व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com