Jyoti Subhash In Dunki Film You Tube
मनोरंजन बातम्या

Dunki Teaser: किंग खानच्या ‘डंकी’मध्ये झळकल्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, साकारणार महत्वपूर्ण भुमिका

Dunki Film: किंग खानच्या ‘डंकी’ या चित्रपटामध्ये मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दिसत आहे.

Chetan Bodke

Jyoti Subhash In Dunki Film

बॉलिवूडचा किंग खान आज ५८ वा वाढदिवस साजरा करीत आहे. आज किंग खानची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होताना दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या शाहरुखच्या नावाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. शाहरुखने आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे. शाहरुखच्या बहुप्रतिक्षित ‘डंकी’चा टीझर आज रिलीज झाला आहे. किंग खानच्या या आगामी चित्रपटामध्ये मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दिसत आहे. (Actor)

अवघ्याच काही सेकंदाच्या टीझरमध्ये अभिनेत्रीची जोरदार चर्चा होते. चित्रपटामध्ये शाहरुखसोबत मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष दिसणार आहेत. त्यांच्या बॉलिवूड एन्ट्रीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होते. ज्योती सुभाष यांनी चित्रपटामध्ये आजीचे पात्र साकारलेय. शाहरुखच्या मित्राची आई त्याच्या आजीची शपथ घ्यायला सांगते. टीझरमध्ये ज्योती सुभाष म्हणतात, अरे सारखी माझीच काय शपथ घेता? आणि पुढे त्या आजीचं निधन झालेलं दिसतं. या धम्माल कॉमेडी प्रसंगाने सर्वच लोटपोट हसताना दिसत आहे. (Bollywood Film)

शाहरुखच्या अनेक सिनेमांमध्ये मराठी अभिनेत्री मुख्य भुमिकेत दिसतात. ‘जवान’नंतर ‘डंकी’मध्येही मराठी अभिनेत्री दिसली आहे. ‘जवान’मध्ये शाहरुखसोबत अभिनेत्री गिरीजा प्रभुने मुख्य भुमिका साकरली होती. तर ‘डंकी’मध्येही मराठी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष दिसत आहेत. ज्योती सुभाष यांनी अनेक नाटक, सिरियल, चित्रपट, शॉर्ट फिल्म अशा विविध माध्यमांमध्ये काम केलंय. (Marathi Actress)

२०१८ मध्ये शाहरुख खानचा ‘झिरो’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्यानंतर शाहरुखचा कोणताही चित्रपट रिलीज झाला नाही. पाच वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर शाहरुखने ‘पठान’ चित्रपटातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दमदार पुन:रागमन केले. २०२३ मध्ये शाहरुखचा ‘पठान’ चित्रपट रिलीज झाला. त्यानंतर ‘जवान’ रिलीज झाला होता. त्यानंतर आता ‘डंकी’ रिलीज होणार आहे.

चित्रपटामध्ये मुख्य भुमिकेत शाहरुख खान, तापसी पन्नू, दिया मिर्झा, बोमन इराणी अशी दमदार कलाकारांची स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. तर चित्रपटामध्ये विकी कौशल कॅमिओ करणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ चित्रपट येत्या २१ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्र हादरला! एकट्यात बसलेल्या मुलीवर वाकडी नजर; नराधमाकडून स्वतःच्या घरी नेऊन अत्याचार

Maharashtra Live News Update: शरद पवार बारामतीत अॅक्शन मोडवर

UPI Wrong Transfer: UPI वरून चुकीच्या खात्यात पैसे गेले? नियम काय सांगतो? वाचा...

Tea Types: तुम्हीही चहाप्रेमी आहात? मग चहाचे हे 5 प्रकार नक्की ट्राय करा

Government Aircraft : सरकारी हवाई वाहनांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

SCROLL FOR NEXT