Adipurush OTT Release Date Declared Saam Tv
मनोरंजन बातम्या

Adipurush OTT Release: बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेला ‘आदिपुरूष’ ओटीटीवर पाहता येणार, कोणत्या प्लॅटफॉर्मवर कधी दिसणार?

Chetan Bodke

Adipurush OTT Release Date Declared: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चित्रपट गेल्या १६ जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर ‘आदिपुरूष’ चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. थिएटरमध्ये प्रेक्षकांनी नापसंद केलेला चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

निर्मात्यांनी सांगितल्याप्रमाणे ५० दिवसांनंतर अखेर चित्रपट ओटीटीवर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. १ ऑगस्ट २०२३ रोजी हा चित्रपट ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. थिएटरमध्ये संमिश्र प्रतिक्रिया मिळालेला चित्रपट आता प्रेक्षक ओटीटीवर पाहू शकणार आहेत. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बजेटच्या अर्धी किंमत देखील पार करू शकलेला नाही. त्यामुळे निर्मात्यांसह, दिग्दर्शक आणि कलाकारदेखील बरेच नाराज झाले आहेत. हा चित्रपट आता ओटीटीवर कशाप्रकारे धमाका करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

घोषणा झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या चित्रपटाला सर्वच स्तरातून विरोध सहन करावा लागला होता. व्हिएफएक्स, पात्रांचे लूक्स यामुळे चित्रपट तुफान ट्रोल झाला. ६०० कोटींमध्ये निर्मित झालेल्या चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर जेमतेम २८६. ३७ कोटींचा टप्पा गाठलाय तर, जगभरात या चित्रपटाने ३९० कोटींची कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शनानंतर चित्रपट तुफान ट्रोल झाला होता. समीक्षकांनी आणि नेटकऱ्यांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली.

रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटात मुख्य भूमिकेत, प्रभास, क्रिती सेनन, सनी सिंह, सैफ अली खान आणि देवदत्त नागे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहे. ‘आदिपुरूष’ चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती ओम राऊतने केली आहे. ओटीटी प्रदर्शनाआधीच हा चित्रपट युट्यूबवर हा चित्रपट लिक झाला होता.

एचडी क्वालिटीमध्ये हा चित्रपट युट्यूबवर व्हायरल झाला होता. खूप कमी कालावधीतच या चित्रपटाला युट्यूबवर अनेक मिलियन व्ह्यूज मिळाले होते. पण लगेचच काही काळानंतर हा चित्रपट युट्यूबवरून हटवण्यात आला.

अखेर आता प्रेक्षकांना आता घरबसल्या ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ वर हा चित्रपट पाहायला मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

SCROLL FOR NEXT