Fighter Twitter Review Saam TV
मनोरंजन बातम्या

Fighter Twitter Review: हृतिक- दीपिकाची लव्ह केमिस्ट्री नेटकऱ्यांना भावली; चाहत्यांनी 'फायटर'ला किती स्टार दिले ?

Fighter Film: हृतिक- दीपिकाच्या 'फायटर'ला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. अनेक युजर्सने सोशल मिडियावर प्रतिक्रिया देणे सुरू केले आहे. चला तर जाणून घेऊया प्रेक्षकांना चित्रपट कसा वाटला?

Chetan Bodke

Fighter Twitter Review

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) स्टारर 'फायटर' (Fighter) चित्रपट आज (२५ जानेवारी) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये चित्रपटाची चर्चा होत आहे. इतर चित्रपटांप्रमाणेच या सुद्धा चित्रपटाचं ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ सकाळी लवकर होता. प्रेक्षकांनी फर्स्ट शोला मोठ्या प्रमाणावर हजेरी लावलेली दिसत आहे. अनेक युजर्सने सोशल मिडियावर प्रतिक्रिया देणे सुरू केले आहे.चला तर जाणून घेऊया प्रेक्षकांना चित्रपट कसा वाटला? (Bollywood Film)

सध्या सोशल मीडियावर #FighterFirstDayFirstShow नावाचा हॅशटॅग प्रचंड ट्रेंड होत आहे. चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होताना दिसत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर पहिला युजर म्हणतो, "खूपच अप्रतिम चित्रपट आहे. दीपिका, हृतिक आणि अनिल सह इतर स्टारकास्टचाही दमदर अभिनय आहे." (Social Media)

तर आणखी एक युजर म्हणतो, "चित्रपटामध्ये एरियल सीन आहे (Aerial Scene) त्या सीनने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सर्वच स्टारकास्टचा उत्तम अभिनय." सर्वच युजर्सने हृतिक रोशनच्या अभिनयाचे तोंडभरून कौतुक केले आहे. तर एका युजरने त्याच्या अभिनयाचे कौतुक करत तो कसा बेस्ट ॲक्टर आहे, याबद्दल सांगितले. (Bollywood Actor)

चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला २० जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांना हा मोस्ट अवेटेड चित्रपट 2D, 3D, IMAX 3D आणि 4DX 3D या पद्धतीने पाहायला मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. चित्रपटाला सध्या सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत असून चाहत्यांनी चित्रपटाला सर्वाधिक स्टार देण्याचा प्रयत्न केला आहे. (Bollywood Actress)

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर २५ जानेवारीला चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटात हृतिक रोशनसोबत दीपिका पदुकोण, अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यासोबतच ऋषभ साहनी, अक्षय ओबेरॉय, करण सिंग ग्रोवर, आकर्ष अलग आणि संजीदा शेख ही स्टारकास्ट सुद्धा चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. फायटरचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले असून वायकॉम 18 स्टुडिओच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT