kartik aryan yandex
मनोरंजन बातम्या

Kartik Aaryan: बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यनची संपत्ती किती? एका चित्रपटासाठी घेतो 'एवढे' मानधन

Kartik Aaryan Net Worth: कार्तिक आर्यन बॅलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक प्रसिद्ध अभिनेता आहे. अभिनेत्याने अनेक चित्रपटांत काम केले असून सर्व चाहत्यांची मने जिंकली आहेत. युवा अभिनेता असणाऱ्या कार्तिकची संपत्ती थक्क करण्यासारखी आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॅलिवूड इंडस्ट्रीमध्ये कार्तिक आर्यन एक सुप्रसिद्ध युवा अभिनेता आहे. कार्तिकच्या उत्कृष्ट अभिनयाने आणि हटके स्टाइलने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्याने अनेक चित्रपटांत काम करुन बॅलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे. अभिनेता कार्तिक प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारताना पाहायला मिळत असतो. त्याचबरोबर कार्तिकचे चंदू चॅम्पियन, भूल भूलैया, सोनू के टीटू की स्वीटी यांसारखे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. कार्तिक सोशल मिडियावर देखील खूप चर्चेत असतो. अभिनेता नेहमीच चाहत्यांसाठी नवनवीन अपडेट्स सोशल मडियावर शेअर करत असतो. सध्या बॅलिवूडच्या युवा अभिनेत्याने यशस्वी होऊन करोडोंची संपत्ती कमवली आहे. अभिनेता कार्तिकची एकूण संपत्ती किती आहे, हे जाणून घेऊयात.

अभिनेता कार्तिक एक प्रसिद्ध अभिनेता असून त्याचा सोशल मिडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेता कार्तिक एका चित्रपटामधून ४० ते ५० कोटी रुपये कमवत असतो. कार्तिक ब्रँड एंडोर्समेंट जाहिरातीसाठी ३ ते ५ कोटी रुपये घेतो. सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता कॅडबरी, मॅकडोनाल्ड्स, स्लिक,फॅन्टा,डूल्स, नॅार सूप यांसारख्या अनेक ब्रँड्समध्ये सहभागी आहे. अभिनेत्याची अनेक ठिकाणी मालमत्ता देखील आहे. अभिनेत्याचे जुहू मुंबई येथे अलिशान असे अपार्टमेंट आहे. त्या अलिशान अपार्टमेंटची किंमत १७.५० कोटी रुपये आहे. त्याचबरोबर वर्सेावा येथे कार्तिकचा १,६० कोटी रुपयांचा फ्लाट देखील आहे.

अभिनेता कार्तिकला गाड्यांची प्रचंड आवड असल्याने त्याच्याकडे कार आणि बाईकचे खूप मोठे क्लेक्शन आहे. कार्तिककडे ६ कोटी रुपयांची रेंज रोव्हर आणि लॅम्बोर्गिनी ऊरुस ४ कोटी रुपयांची आहे. त्याचबरोबर अभिनेत्याकडे मॅक्लारेन जीटी ३.७२ कोटी रुपयांची आहे, आणि बीएम डब्लू सीरीज 520 कार ८५ लाख रुपयांची आहे, त्याचबरोबर पोर्श 718 बॅाक्सस्टर १.३६ कोटी रुपयांची आहे. अभिनेत्याकडे डुकाटी स्क्रॅम्बलर बाईक आहे. ज्याची किंमत १५ लाख रुपये आहे. त्याचबरोबर कार्तिककडे रॅायल एनफील्ड हंटर 350 ची किंमत १.२० लाख रुपये आहे. अभिनेता एक फॅशन आयकॅान असल्यामुळे त्याच्याकडे अनेक डिजायनर आउटफिट्स आणि अक्सेसरीज देखील आहेत. बॅलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याकडे ३९ किंवा ४६ करोड रुपयांची संपत्ती आहे.

Maharashtra Live News Update: स्वातंत्र्यदिनी जळगाव शहरात प्रथमच मांसविक्रीवर बंदी !

Vastu Tips: भाद्रपद महिन्यात तुळशीला अर्पण करा 'ही' खास वस्तू, होतील आर्थिक लाभ

Accident News : मालवाहू गाड्यांची समोरासमोर धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू

पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का; भाजपने पाडले खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीला रामराम

Maharashtra Politics: ठाकरे आणि शिंदे एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

SCROLL FOR NEXT