Vivek Agnihotri  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vivek Agnihotri: 'बेशरम रंग' वरुन विवेकवरच ट्रोलर्स उलटले, लेकीचे फोटो शेअर करत नेटकऱ्यांनी झाडले....

दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरुन झालेल्या वादावर 'द काश्मिर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ही चित्रपटाला ट्रोल केले होते.

Chetan Bodke

Vivek Agnihotri: सध्या सोशल मीडियावर शाहरुख- दीपिका प्रमुख भूमिकेत असलेल्या 'पठान' चित्रपटाला बरेच ट्रोल केले जात आहे. या वादावर सर्वच क्षेत्रातून टीका करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांसोबतच अनेक बॉलिवूडमधील कलाकार असो किंवा दिग्दर्शक असो सर्वांनीच चित्रपटाला ट्रोल केले तर काहींनी चित्रपटाला पाठिंबा दिला.

या सर्व वादावर 'द काश्मिर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ही चित्रपटाला ट्रोल केले. चित्रपटातील 'बेशरम रंग' असलेल्या या गाण्यावर टिका केली आहे.

दिग्दर्शकांनी केलेली ही टिका आता त्यांच्यावरच उलटलेली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या मुलीचेच भगव्या बिकीनीवरील काही फोटोज शेअर करत त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. काल त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या अश्लिलतेवर भाष्य केले होते. किशोरवयीन मुलगी आताच्या पिढीवर होत असलेल्या परिणामांवर चिंता व्यक्त करताना दिसत होती. या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर ट्रोलिंग सुरु केली.

नेटकऱ्यांनी विवेक अग्निहोत्रींना प्रत्युत्तर करत म्हणतात, 'विवेक अग्निहोत्रीला बॉलिवूड अभिनेत्रींच्या बिकीनीचा त्रास होत आहे, पण त्याच्या मुलीचे सोशल मीडिया अकाऊंट बिकीनीच्या फोटोंनीच भरले आहे.

'पठान युनिव्हर्स नावाच्या ट्वीटर हॅंडलवरुन मल्लिका अग्निहोत्रीला ट्रोल केले जात आहे, नेटकरी सध्या विवेक आणि त्यांची लेक मल्लिकाला ट्रोल करत म्हणतात, "विवेक अग्निहोत्री, तुम्ही विचार करावा. आता तुमची मुलगी भगवी बिकिनी घालत धर्माचा अपमान करत आहे आणि भावना दुखावत आहे."

सोबतच आणखी काही नेटकरी म्हणतात, "ज्यांची घरे काचेची आहेत, ते दुसऱ्यांच्या घरावर दगडफेक करत नाहीत." तर आणखी एक युजर म्हणतो, “समाज भगव्या रंगाचा अपमान सहन करणार नाही. तुमच्या मुलीने भगव्या रंगाचा अपमान केला आहे.

वडिलांचे विधान आणि मुलीचे त्याच्या विपरीत फोटो शेअर करून सोशल मीडियावर विवेक यांना चांगलंच ट्रोल केलं जात आहे. नेटकऱ्यांनी यावेळी विवेक यांना 'झिद' आणि 'हेट स्टोरी' त्यांच्या चित्रपटांची आठवण करून दिली. ज्या वेळी हे चित्रपट आले, तेव्हा त्यांनी महिलांबाबत बरेच वादग्रस्त विधान केले होते, त्या विधानाच्या आधारावरही नेटकरी त्यांना सध्या ट्रोल करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bail Pola 2025: यंदा बैलपोळा सण कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

Jolly LLB 3 : अक्षय आणि अर्शदला पुणे न्यायालयाचा दणका, 'जॉली एलएलबी ३' वादाच्या भोवऱ्यात

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

SCROLL FOR NEXT