Krishna Bhat And Vedant Sharada Wedding Instagram
मनोरंजन बातम्या

Vikram Bhat Daughter Krishna Bhat Wedding: बन्नो मेरी चली ससुराल... विक्रम भट यांची लेक कृष्णा अडकली विवाहबंधनात, लग्नाला या बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी

Krishna Bhat And Vedant Sharada Wedding: बॉलिवूडचे फेमस डायरेक्टर विक्रम भट्ट यांची लेक कृष्णा भट्टने बॉयफ्रेंडसोबत ११ जून रोजी लग्नगाठ बांधली.

Chetan Bodke

Krishna Bhat Tied Knot with Boyfriend Vedanta Sarada: बॉलिवूडचे फेमस डायरेक्टर विक्रम भट्ट यांची लेक कृष्णा भट्टने बॉयफ्रेंड वेदांतसोबत काल अर्थात ११ जून रोजी लग्नगाठ बांधली. काल कृष्णा आणि वेदांतने कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली. जयमाला समारंभानंतर कृष्ण भट्ट आणि वेदांत यांनी एकत्र येत कॅमेऱ्यासमोर हटके पोजेस दिल्या. या दोघांचाही साखरपुडा गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झाला होता. अखेर त्यांनी काल लग्नगाठ बांधत चाहत्यांना गुड न्यूज दिली.

सध्या सोशल मीडियावर कृष्णा भट्टच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. कृष्णा भट्ट आणि बॉयफ्रेंड वेदांत सारडा यांची जोडी खूपच सुंदर दिसून येत आहे. कृष्णा भट्टच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी अमिर खान, सनी लियोनी, बॉबी देओल, कुणाल कपूर, पूजा भट्ट, संदीपा धर आणि अविका गोरसोबत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

कृष्णा भट्टच्या लग्नासाठी सनी लियोनीने पती आणि मुलांसोबत लग्नासाठी उपस्थिती लावली होती. तर पूजा भट्ट वडील महेश भट्ट आणि इतर कुटुंबीयांसोबत ती लग्नासाठी पोहोचली होती. कृष्णा आणि वेदांत यांच्या लग्नातील अनेक व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते लग्नाचे विधी करत असतानाचे देखील अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. (Entertainment News)

कृष्णा भट्ट एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हणतो, कृष्णाने जूनमध्ये लग्न करण्याचा विचार केला होता, अखेर त्याचा प्लॅन यशस्वी झाला आहे. सोबतच महत्वाची बाब म्हणजे, त्यांचा आगामी चित्रपट याच महिन्यात अर्थात २३ जून रोजी प्रदर्शित होत असल्याने ती आणखीनच आनंदित झाली आहे.

कृष्णाचे पती वेदांत शारदा हा WTFair नावाचे ट्रॅव्हल इंजिन चालवतो. कृष्णाने सांगितले होते की हे सर्वात वेगवान हॉलिडे प्लॅनिंग इंजिन आहे. वेदांतने 2014 मध्ये आपल्या भावासोबत या कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीअंतर्गत त्यांनी आणखी अनेक गोष्टी सुरू केल्या आहेत.

लाडक्या लेकीला सासरी जाताना निरोप देताना वडिल विक्रम भट नक्कीच भावूक झाले यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! जन्मदात्या आई-वडिलांच्या डोक्यात मुलाने घातला वरवंटा; मृतदेहाचे तुकडे गोणीत भरले

Blouse for Every Saree: प्रत्येक बाईकडे असायला हवे कोणत्याही साडीवर परफेक्ट मॅच होणारे हे ७ प्रकारचे ब्लाउज

Slim Look In Saree: साडी नेसल्यावर जाड दिसता? ही १ टेकनिक वापरा, तुम्हीच दिसाल रेखीव

Maharashtra Live News Update: कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या वकिलावर गुन्हा दाखल

Maharashtra Politics : बंडखोरी रोखण्यासाठी जालीम उपाय; बंडखोरांची ठाकरे बंधू कोंडी करणार?

SCROLL FOR NEXT