raj kapoor pakisthan birth place saam Tv
मनोरंजन बातम्या

Raj Kapoor 100th Birth Anniversary: भारतच नाही तर पाकिस्तानमधील 'या' ठिकाणी देखील साजरा केली राज कपूर यांची जन्मशताब्दी

Raj Kapoor 100th Birth Anniversary : ​​१४ डिसेंबर रोजी दिग्गज अभिनेते राज कपूर यांची १०० वी जयंती देशभरात साजरी करण्यात आली. हा खास दिवस पाकिस्तानमध्येही साजरा करण्यात आला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Raj Kapoor 100th Birth Anniversary : भारतीय चित्रपटसृष्टीचे दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते राज कपूर यांनी अनेक सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. १४ डिसेंबर २०२४ रोजी राज कपूर यांची १०० वी जयंती साजरी झाली. कपूर कुटुंब आणि त्यांच्या चाहत्यांनी हा खास दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. विशेष म्हणजे भारताव्यतिरिक्त पाकिस्तानातील पेशावरमध्येही हा खास दिवस साजरा करण्यात आला, ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

राज कपूर यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ रोजी सध्याच्या पाकिस्थानातील पेशावर येथील वडिलोपार्जित 'कपूर हवेली' येथे झाला. त्या काळात पेशावर अखंड हिंदुस्थानातील एक भाग होता. जे आता पाकिस्तानात आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये राज कपूर यांच्या नावाने केक कापला जात आहे.

पाकिस्तानमध्ये राज कपूर यांची जयंती साजरी करण्यात आली

X हँडल (ट्विटर) वरून मुहम्मद फहीमच्या अधिकृत अकाऊंटवरून राज कपूर यांच्या छायाचित्रासह एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्याचे 'हॅप्पी बर्थडे राज कपूर, त्यांची १०० वी जयंती आज पाकिस्तानातील पेशावर येथे साजरी झाली.' असे कॅप्शन लिहिले आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, केकवर १०० मेणबत्ती आहे आणि हॅपी बर्थडे राज कपूर आहे .

वृत्तानुसार, पाकिस्तानातील पेशावरमधील कपूर हवेलीला ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहे. पाकिस्तान सरकारने या हवेलीचे संग्रहालयात रूपांतर करण्याची तयारी सुरु केली आहे. ही हवेली राज कपूर यांचे आजोबा दिवाण बशेश्वरनाथ कपूर यांनी बांधली होती. राज कपूर यांचा जन्म तिथेच झाला, पण स्वातंत्र्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत आले.

राज कपूर यांची चित्रपट कारकीर्द

वयाच्या १० व्या वर्षी राज कपूर इन्कलाब चित्रपटात दिसले होते. मुख्य अभिनेता म्हणून राज कपूर यांनी १९४७ मध्ये प्रदर्शित झालेल्या नील कमल या चित्रपटात काम केले. यानंतर राज कपूर यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अगदी लहानपणापासूनच राज कपूर यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही आपला ठसा उमटवला होता. राज कपूर यांचे २ जून १९८८ रोजी नवी दिल्ली येथे निधन झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला दहा तास पूर्ण

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

SCROLL FOR NEXT