Anurag Kashyap on Rocky Aur Rani Ki Prem Kahani Instagram
मनोरंजन बातम्या

Anurag Kashyap on Rocky Aur Rani Ki Prem Kahani: अनुराग कश्यपने ‘रॉकी और रानी की...’ दोनदा पाहिला, चित्रपटाचे कौतुक करत सांगितले कारण; दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

Anurag Kashyap Post: रूपेरी पडद्यावर रणवीर- आलियाची जोडी प्रेक्षकांच्या फारच पसंदीस उतरत असून सर्वच स्तरातून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय.

Chetan Bodke

Anurag Kashyap Praised Karan Johar Film

आलिया भट्ट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असलेले ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. करण जोहर दिग्दर्शित चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करीत आहे. रूपेरी पडद्यावरील रणवीर- आलियाची जोडी प्रेक्षकांच्या फारच पसंदीस उतरत असून सर्वच स्तरातून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. नुकताच बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने एक चित्रपटाचे कौतुक केले आहे.

सर्वच स्तरातून करण जोहर दिग्दर्शित चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत असताना चित्रपटाचे कौतुक करणाऱ्यांच्या यादीत दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचेही देखील नाव जोडले गेलेय. त्यांनी चित्रपटाविषयी एक भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये अनुराग कश्यप यांनी चित्रपटासह दिग्दर्शकांचेही कौतुक केले आहे. इतकंच नाही तर हा चित्रपट अनुराग कश्यपला आवडला असून त्यांनी तो चित्रपट एकदा नाही तर, दोनदा पाहिला आहे, असा दावा देखील त्याने केला आहे. अनुरागने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून चित्रपटाचे कौतुक केले आहे.

अनुराग कश्यप शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणतो, “करण जोहरचा त्याच्या सिनेकारकिर्दितला सर्वोत्तम चित्रपट. करण जोहरचा हा दुसरा चित्रपट आहे, त्याचे मी दोन वेळा तिकिटं खरेदी करून चित्रपट पाहिला. ज्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे, त्यांना मी हा चित्रपट पाहायला सांगतोय. भन्नाट अभिनय करणारा रणवीर सिंग आणि प्रतिभावान आलिया भट्टची जबरदस्त लव्हकेमिस्ट्री चित्रपटाल खूपच वेगळी ओळख निर्माण करून देतेय.” 

“फार मोठ्या काळानंतर बॉलिवूडमध्ये चांगल्या दर्जचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, प्रेक्षकांना यामध्ये खूप चांगले संवाद पाहायला मिळणार आहेत. चित्रपटातील अनेक संवादांमुळे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडतोय. धर्मेंद्र आणि शबाना आझमींची एकतर्फी प्रेमकथा, मातृसत्ताक दाखवलेली जया बच्चन चित्रपटात हा भाग फारच आवडला आहे. हा चित्रपट पाहताना माझं खूप चांगल्या पद्धतीने मनोरंजन झालं. मी चित्रपट पाहताना मनमोकळेपणाने हसलो, रडलो आणि माझं चांगल्या पद्धतीने मनोरंजनही झालं. करणने या चित्रपटात स्वत:चं सर्वस्व पणाला लावत या चित्रपटाची त्याने निर्मिती केली आहे.”

अनुरागच्या या पोस्टवर अनेक यूजर्सने त्याला पोस्टवरून ट्रोल केलं आहे. तर काहींनी त्याने करण जोहरच्या चित्रपटाचा खूप चांगला रिव्ह्यू दिल्याबद्दल त्याचे कौतुक करत आहेत. तर अनेक युजर्सने करणच्या चित्रपटाचं प्रमोशन करतोय, असा देखील त्याच्यावर आरोप केला आहे.

अनुरागला ट्रोल करत युजर्स म्हणतात, ‘आम्ही तुमचे विचार जास्त विचारात घेत नाहीत, तर तुम्ही आता खोटी प्रशंसा थांबवा.’ तर आणखी एक युजर्स म्हणतो, ‘चित्रपटाचे प्रमोशन थांबव.’ तर आणखी एका युजरने त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली की, ‘अनुराग कश्यप करण जोहरच्या चित्रपटाचे प्रमोशन करतोय, खरंच विकासाची गरज आहे?’

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Lokhande : नाकात नथ अन् कानात बुगडी; अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज, पाहा PHOTO

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Shweta Tiwari: 'चाळीशीतही क्यूट दिसतेस' श्वेता तिवारीचे नवीन फोटो चर्चेत

Shocking: आई-बापाने काबाड कष्ट करत म्हशी घ्यायला पै पै जमवली, मुलानं 'फ्री फायर' गेमसाठी ५ लाख उडवले

SCROLL FOR NEXT