Luka Chupi 2 Look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Luka Chuppi 2: तारीख ठरली... सारा- विकीचा आगामी चित्रपट जूनमध्ये होणार रिलीज, सोशल मीडियावर चर्चा जोरात

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘लुका छुपी २’ चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन केली आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Chetan Bodke

Sara Ali Khan Vicky Kaushal New Film: सारा अली खान आणि विक्की कौशल सध्या हे दोघेही त्यांच्या आगामी चित्रपटामुळे बरेच चर्चेत आहे. ‘लुका छुपी २’ मध्ये ही जोडी दिसणार आहे. हा चित्रपट येत्या २ जून रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘लुका छुपी २’ चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन केली आहे. हा चित्रपट आयपील २०२३ नंतर प्रदर्शित होणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरूखचा बहुप्रतिक्षित ‘जवान’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील पुढे ढकलण्यात आली आहे. चित्रपटाच्या व्हीएफएक्स साठी जरा वेळ लागणार असल्याने निर्मात्यांनी हा महत्वपुर्ण निर्णय घेतला. व्हीएफएक्स एडिटींग बाकी असल्यामुळे निर्मात्यांनी ‘जवान’ चित्रपट ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सारा अली खान आणि विक्की कौशल मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख २ जून २०२३ करण्यात आली आहे.

पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, “आयपीएल २०२३ चा मौसम संपल्यानंतर, हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हा चित्रपट प्रदर्शित करण्याची उत्तम वेळ असेल. ‘जवान’ चित्रपटाची देखील प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

निर्मात्यांच्या आणि निर्मात्यांच्या मते, चित्रपट प्रदर्शित करण्याची ती उत्तम वेळ असेल. लवकरात लवकर ट्रेलर प्रदर्शित देखील करण्याची शक्यता आहे.” निर्मात्यांच्या मते, हा चित्रपट सर्वांच्याच पसंदीस पडणार आहे. सध्या तरी निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव ‘लुका छुपी २’ ठेवले असून कदाचित चित्रपटाचे नाव बदलण्याची शक्यता आहे.

अनेक बड्या चित्रपटांच्या निर्मात्यांनी आयपीएलचे कारण पुढे करत चित्रपट प्रदर्शनासाठी नकार दिला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रभासचा ‘आदिपुरूष’देखील नंतर प्रदर्शित होणार आहे. सध्या अनेक बॉलिवूड चित्रपटांची सोशल मीडियावर कमालीची चर्चा सुरू आहे.

सारा अली खान आणि विक्की कौशल पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर एकत्र येणार आहे. त्यानंतर विक्की ‘सॅम बहाद्दूर’ या चित्रपटात देखील झळकणार आहे. या चित्रपटात विक्कीने फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉची भूमिका साकारणार आहे. सारा आणि विक्की हे दोघेही सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय असून त्यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुथडी वाहणाऱ्या मिठी नदीत तरूण वाहून गेला, एका दोरीमुळे बचावला; थरारक VIDEO समोर

Viral Video: ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का? पावसावर तरुणीचा भन्नाट रॅप, सोशल मीडियावर धुमाकूळ

Priya Bapat Photos : प्रिया बापटचा बॉसी लूक पाहिलात का? अभिनेत्रीच्या सौंदर्याने केली जादू

Maharashtra Rain Live News: मुसळधार पावसाने मुंबईची जीवनवाहिनी ठप्प, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक बंद

Marathwada Rain : मराठवाड्यातील पाण्याची चिंता मिटली; प्रमुख ११ धरणाची शंभरीकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT