Bollywood Celebrity Drug Party  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bollywood Celebrity Drug Party : बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन! नोरा फतेही, श्रद्धा कपूर पार्टीत? धक्कादायक खुलासा कुणी केला?

Bollywood Celebrity Drug Case : बॉलिवूड पुन्हा एकदा ड्रग्ज पार्टीमुळे चर्चेत आले आहे. नोरा फतेही, श्रद्धा कपूर या कलाकारांची नावे पुढे आली आहेत. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड कलाकार पुन्हा एकदा ड्रग्ज प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत.

ड्रग्ज प्रकरणामध्ये बॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांची नावे आहेत.

मुंबईत पुन्हा एकदा बॉलिवूडच्या सिनेतारकांची ड्रग्ज पार्टी झाली.

साम टिव्ही प्रतिनिधी-सुप्रीम मसकर

बॉलिवूडमधील सिनेस्टारची ड्रग्ज पार्टी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ज्यामुळे बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन उघड झालं आहे. बॉलिवूडला हादरवणारी ही ड्रग्ज पार्टी नेमकी कुठे झाली? ड्रग्ज आणि बॉलिवूडचे नेमकं समीकरण कसं आहे? जाणून घेऊयात.

ड्रग्ज आणि बॉलिवूड हे समीकरण तसे नवीन नाही. याआधीही बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांवर ड्रग्ज पार्टीचे आरोप झाल आहेत. अशातच आता मुंबईत पुन्हा एकदा बॉलिवूडच्या सिनेतारकांची ड्रग्ज पार्टी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे आता बॉलिवूडचे कलाकार चांगलेच अडचणीत आले आहेत.

बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन?

दाऊदच्या टोळीशी संबंधित आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा मुंबईत पर्दाफाश करण्यात आला. ड्रग्ज रॅकेटशी संबंधित आरोपी मोहम्मद सलीम शेखला दुबईतून भारतात आणण्यात आले. शेखनेच बॉलिवूडमधील कलाकरांना अंमली पदार्थ पुरवल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, श्रद्धा कपूर, तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर, नोरा फतेही, ओरहान अवत्रामणी ऊर्फ ओरी, अंडरवरल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा अतिशाह पारकर, अब्बास-मस्तान यांच्यासह अनेक सेलिब्रिटीचा ड्रग्ज पार्टीत समावेश होता.

बॉलिवूडमधील कलाकारांच्या या ड्रग्ज पार्ट्या दुबई आणि गोवामध्ये झाल्याचेही समोर आले आहे. या पार्टीत सलीम शेख स्वत:सहभागी होता. त्यामुळे आरोपी सलीम शेखने माहिती दिल्यानंतर आता बॉलिवूड कलाकारांचीही चौकशी करण्यात येणार आहे. या ड्रग्ज तस्करीत सलीम शेख व्यतिरिक्त कोणत्या तस्करांचा संबंध आहे? या ड्रग्ज पार्ट्यांना कुठून आणि कसा पैसा आला? आता बॉलिवडूच्या या ड्रग्ज पार्टीत आणखी कोणाचा समावेश होता? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Winners List : बिग बॉस सीझन 1 ते 19; कोण कोण ठरलं BB ट्रॉफीचे मानकरी? पाहा विजेत्यांची यादी

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी; फरहाना भट्टला दिली मात

Bigg Boss 19 - Pranit More : 'बिग बॉस १९' चे घर गाजवणाऱ्या महाराष्ट्रीयन भाऊची संपत्ती किती?

Pranit More Struggle Journey : दादरची चाळ ते बिग बॉसचे घर कसा होता प्रणित मोरेचा संघर्षमय प्रवास? वाचा महाराष्ट्रीयन भाऊची कहाणी

SCROLL FOR NEXT