सध्या देशामध्ये 'इंडिया'च्या (India) नावावरून जोरदार वाद सुरु आहे. सोशल मीडियापासून (Social Media) ते सर्वसामान्यांपर्यंत याच मुद्द्यावरून चर्चा सुरु आहे. आपल्या देशाचे एकच नाव असावं असे अनेकांचे मत आहे. यावरुन जो वाद सुरु झाला आहे यामुळे दोन गट तयार झाले आहे. काहींनी देशाचे नाव इंडिया बदलून भारत करण्याला पाठिंबा दिला आहे तर काहींनी याला विरोध केला आहे. इंडिया विरुद्ध भारतच्या वादामध्ये आता बॉलिवूड सेलिब्रिटींनी उडी मारली आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यानंतर आता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि कंगना रनौतने (Kangana Ranaut) आपले मत स्पष्टपणे व्यक्त केले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी इंडिया विरुद्ध भारतवर आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, 'जर भारताला भारत म्हटले जात असेल तर ती वाईट गोष्ट नाही. पूर्वी आपल्या देशाला भारत म्हटले जायचे ना. माझे नाव जॅकी आहे, काही मला जॉकी म्हणतात तर काही मला जाकी म्हणतात. लोकं माझं नाव बदलतात यामुळे मी नाहीना बदलणार. फक्त नाव बदलले. आपण बदलत नाही. तुम्ही लोकं देशाचे नाव बदलत राहता. पण हे नका विसरु की आपण भारतीय आहोत.'
बॉलिवूडची ड्रामा क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रनौतने देखील यावर आपले मत मांडले आहे. कंगनाने ट्विटरवर तिची एक जुनी पोस्टच शेअर केली आहे. २०२१ मध्ये तिने ही पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने असे म्हटले होते की, "'गुलाम नाम' इंडियाला रद्द करायला हवं. त्याऐवजी देशाला 'भारत' म्हणायला हवं." कंगनानं हिच पोस्ट इंडिया वादाच्या दरम्यान रिशेअर केली. यावर तिने असे लिहिले की, 'आणि काही लोक याला काळी जादू म्हणताय... ही फक्त धूसर बाब आहे प्रिये... सर्वांचे अभिनंदन!! एक गुलाम नावापासून मुक्त झालो आहोत... जय भारत.' कंगनाचे हे ट्वीट चर्चेत आले आहे.
दरम्यान, बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांनी देखील इंडियाच्या वादादरम्यान मंगळवारी ट्वीट केले होते. त्यांचे हो ट्वीट चर्चेत आले होते. या ट्विटमध्य त्यांनी फक्त. 'भारत माता की जय', असे लिहिले होते. त्याच्या या ट्विटचा संबंध थेट इंडिया विरुद्ध भारतच्या मुद्द्यावर लावण्यात आला होता. असे वाटत आहे की अमिताभ बच्चन यांनी देशाचे नाव भारत करण्याला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या ट्विटवर चाहते कमेंट्स करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.