आपचे खासदार राघव चढ्ढा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा साखरपुडा झाल्यापासून त्यांच्या लग्नाची चर्चा चाहत्यांमध्ये होत आहे. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्राने नवी दिल्लीमध्ये १३ मे ला यांचा साखरपुडा झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, परिणीती-राघव या सप्टेंबर महिन्यात उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधणार आहे. येत्या २३ आणि २४ सप्टेंबरला राघव- परिणीतीचा शाही लग्नसोहळा पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांनी उदयपुरमधील लग्नाच्या विधीसाठी एका अलिशान हॉटेलमध्ये बुकींग करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, परिणीती- राघव यांच्या लग्नाकरिता उदयपूरमधल्या हॉटेल लीला पॅलेस (Hotel Leela Palace) आणि उदयविलास हॉटेल (Hotel Udayavilas) ची बुकिंग करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. २३ आणि २४ सप्टेंबरला उदयपूरमधील सितारा हॉटेलमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. सोबतच, उदयपूरमधील हॉटेल लीला पॅलेस आणि हॉटेल उदयविलास येथे लग्नाचे विधी पार पडणार असून त्याच हॉटेलमध्ये पाहुण्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राघव- परिणीती यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि देशातील अनेक राजकीय मंडळी देखील त्यांच्या लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. परिणीती- राघवचे लग्न २३ आणि २४ सप्टेंबरला होणार असून त्यांच्या लग्नासाठी पाहुणे २२ तारखेपासूनच उपस्थिती लावणार आहेत. २३ सप्टेंबरपासून मेहंदी, हळदी आणि संगीताच्या कार्यक्रमाला सुरू होणार असून २४ सप्टेंबरला दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत.
राघव- परिणीती यांच्या रिलेशनची बरीच चर्चा रंगली होती. दोघांनीही साखरपुड्याआधी त्यांच्या नात्यावर अधिकृत माहिती दिली नव्हती. अखेर त्यांनी साखरपुडा करतच त्यांच्या नात्याबद्दल जाहीर कबुली दिली होती. दोघेही मार्च महिन्यामध्ये मुंबईतील एका हॉटेलमध्ये डीनरसाठी स्पॉट झाले होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.