प्रत्येक कलाकृतीला कौतुक मिळणे हे आवश्यक असते. त्या कलाकृतीमागे काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला त्याच्या कामाची पोचपावती मिळायला हवी. कलाकाराला कौतुकाची थाप मिळाली तर त्यांना काम करण्याचा अजून हुरूप येतो. म्हणूनच अनेक पुरस्कार सोहळे आयोजित केले जातात. ज्यात कलाकारांना सन्मानित केले जाते. असाच एक सोहळा 'फक्त मराठी' या वाहिनीने आयोजित केला आहे.
फक्त मराठी या वाहिनीने कलाकरांना सन्मानित करण्यासाठी 'फक्त मराठी सिने सन्मान २०२३' पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यात अनेक चित्रपटांना त्यांच्या कामासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी अनेक चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. येत्या १५ सप्टेंबरला हा सोहळा रंगणार आहे.
२०२३ मध्ये अनेक मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे. प्रेक्षकांनी या वर्षी चित्रपटागृहाबाहेर गर्दी केल्याचे दृश्य पाहायला मिळाले. ही मराठी चित्रपटांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे हा पुरस्कार आयोजित केला आहे. यामागे चित्रपट तसेच पडद्यामागील कलाकारांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
फक्त मराठी वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. खूप कमी काळात फक्त मराठी सिने सन्मान या कार्यक्रमाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याबाबत फक्त मराठीच्या हेड यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
'कलेच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत आपलं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या व मराठी चित्रपटसृष्टी बहरावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करणे, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असून हा कौतुक सोहळा कलाकारांना अजून चांगलं काम करण्याची ऊर्जा देईल'. असा विश्वास फक्त मराठी वाहिनीच्या हेड पल्लवी मळेकर यांनी व्यक्त केला.
फक्त मराठी सिने सन्मान सोहळ्यात अनेक चित्रपटांना नामांकन देण्यात आली आहे. यामध्ये चित्रपट, नायक, नायिका, सहाय्यक कलाकार, गायक, अल्बम , दिग्दर्शक, छायांकन अशा अनेक विभागात पुरस्कार देण्यात येणार आहेत.
पुरस्कार सोहळ्यात 'गोदावरी', 'वाळवी', 'वेड', 'अनन्या', 'गोष्ट एका पैठणीची', 'टाईमपास ३', 'महाराष्ट्र शाहीर', 'घर बंदुक बिर्याणी' अशा अनेक चित्रपटांना नामांकन देण्यात आली आहेत. त्यामुळे या वर्षी कोणता चित्रपट बाजी मारणार हे पाहण उत्सुकतेच ठरणार आहे.
यंदा अनेक मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये आपली छाप पाडली आहे. यामध्ये 'एकदा काय झालं' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर 'गोदावरी' चित्रपटासाठी निखिल महाजनला गौरवण्यात आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.