श्रीलंकेचा महान क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरनचे (srilankan cricketer muttiah muralitharans) आयुष्य आता रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मुरलीधरन यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक ‘800’ चा ट्रेलर (800 Trailer ) नुकताच रिलीज झाला. जबरदस्त ट्रेलर पाहून हा चित्रपट कधी रिलीज होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मुंबईमध्ये 'क्रिकेटचा देव' अर्थात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या हस्ते लाँच करण्यात आला.
या चित्रपटामध्ये मुरलीधरनचे बालपन, त्याच्या आयुष्यात आलेल्या अडचणी, लहानपणापासून क्रिकेटची आवड असणाऱ्या मुरलीधरनला क्रिकेट खेळताना कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला यासर्व गोष्टी आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात मुरलीधरनची भूमिका अभिनेता मधुर मित्तल साकारत आहे. मधुर मित्तलने ऑस्कर विजेता चित्रपट 'स्लमडॉग मिलेनियर'मध्ये काम केले आहे.
800 या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला मुरलीधरनच्या भूमिकेत असलेला अभिनेता मधुर मित्तल हा स्टेडिअमवर बॉलिंग करताना दिसत आहे. त्यानंतर थेट मुरलीधरनचे बालपण दाखवण्यात आले आहे. पुढे पुढे मुरलीधरनचा क्रिकेटमधील प्रवास दाखवण्यात आला आहे. याचवेळी क्रिकेटच्या मैदानात मुरलीधरनला कराव्या लागलेल्या अडचणींचा सामना ट्रेलरमध्ये दाखवला आहे. हा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या ट्रेलरला अवघ्या दोन तासांमध्ये २ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
800 चित्रपटाचा ट्रेलर तमिळ आणि तेलुगु भाषेमध्ये रिलीज करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, हा चित्रपट तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेमध्ये देखील रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन एम.एस. श्रीपती यांनी केले आहे. दरम्यान, मुरलीधरनने आपल्या कारकिर्दीमध्ये १३ वेळा सचिन तेंडुलकरला आऊट केले होते. मुरलीधरनने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना भारताविरुद्धच खेळला होता. मुथय्या मुरलीधरनने २००५ मध्ये चेन्नई येथे राहणाऱ्या मधिमलर राममूर्तीसोबत लग्न केले होते. मुरलीधरनचा हा प्रवास रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.