Bhairavi Vaidya Passes Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bhairavi Vaidya Passes Away: 'ताल' फेम अभिनेत्रीचं निधन, सलमान खान आणि ऐश्वर्या रायसोबत केलं होतं काम

Bhairavi Vaidya Movie: ४५ वर्षे त्यांनी अभिनय क्षेत्रात काम केलं होतं. अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं.

Priya More

Bollywood Actress Bhairavi Vaidya Death:

बॉलिवूड (Bollywood) आणि टीव्ही इंडस्ट्रीला (TV Industry) मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य (Bhairavi Vaidya Death) यांचं निधन झालं आहे. ६४ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. ४५ वर्षे त्यांनी अभिनय क्षेत्रात काम केलं होतं.

अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या निधनाने बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. भैरवी यांचे चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट करत दु:ख व्यक्त करत आहेत.

भैरवी वैद्य मागच्या सहा महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत होत्या. उपचारादरम्यान ८ ऑक्टोबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती समोर आली आहे. चाहत्यांनी भैरवी वैद्य यांना शेवटी 'नीमा डेन्जोंगपा' या मालिकेमध्ये पाहिले होतं. भैरवी यांच्या 'हसरतें' आणि 'महीसागर' या शोला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली. भैरवी यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून अशी छाप सोडली होती की आजही त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

भैरवी वैद्य यांनी 'ताल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ऐश्वर्या रायच्या या चित्रपटामध्ये भैरवी यांनी जानकीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांच्या कामाचे खूपच कौतुक झालं होतं. हिंदीसोबतच त्यांनी गुजराती मालिका आणि चित्रपटांमध्ये देखील काम केलं होतं. भैरवी वैद्य यांनी सलमान खानचा चित्रपट 'चोरी-चोरी चुपके-चुपके' मध्ये काम केलं होतं. जरी त्या साइड अभिनेत्री असल्या तरी देखील त्यांनी नेहमी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

भैरवी वैद्य यांच्यासोबत 'व्हेंटिलेटर'मध्ये काम केलेल्या प्रतीक गांधीने सांगितले की, 'मला त्यांच्याबरोबर ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. आमची चांगली बॉन्डिंग होती. त्या खूप प्रेमळ होत्या. मी त्यांना लहानपणी स्टेज आणि टेलिव्हिजनवर काम करताना पाहिले होते आणि त्यांच्या कामाचे मला खूप कौतुक वाटायचे. त्यांचा हसरा चेहरा मी कधीच विसरू शकत नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT