Amitabh Bachchan Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan Birthday: अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त खास लिलाव, ब्लॅक अँड व्हाईट फोटोंसह चित्रपटाच्या पोस्टरला लागली विक्रमी बोली

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज ८१ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाचे खास निमित्त साधत त्यांच्या आयुष्यातील खास गोष्टींचा लिलाव करण्यात आला आहे.

Chetan Bodke

Amitabh Bachchan Birthday

बॉलिवूडचे शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज ८१ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाचे खास निमित्त साधत त्यांच्या आयुष्यातील खास गोष्टींचा लिलाव करण्यात आला आहे. त्यांच्या आयुष्यातील गोष्टींना विकत घेण्यासाठी चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी लाखो रुपयांची बोहली लावत आवडत्या कलाकाराच्या वस्तू विकत घेतल्या आहेत. बॉलिवूडमध्ये बिग बींनी पाच दशकांहून अधिक काळ काम केले आहे. त्या सर्व कामाचाच लिलाव चाहत्यांसाठी केला जात आहे.

बिग बींचा वाढदिवस चाहत्यांसाठी खास बनवण्यासाठी हा खास लिलाव आयोजित करण्यात आला होता. बिग बींच्या काही वस्तूंचा ऑनलाइन लिलाव हाऊस deRivaz & Ives द्वारे ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान लिलाव करण्यात आला. त्या लिलावामध्ये निवडणूक प्रचाराचे कार्ड, शोले टॉक-बॉक्स आणि दीवार या एकाच ऑफसेट शोकार्डने लीलावामध्ये विक्रम केले. पण बिग बींच्या चाहत्यांना सर्वाधिक रस होता, त्यांच्या सहीमध्ये. अनेकांनी बिग बींचा ऑटोग्राफ म्हणून त्यांनी हिंदीत केलेल्या सहीचे कार्ड खरेदी केले.

डिसेंबर १९८४ मध्ये प्रसिद्ध नेत्या हेमवती नंदन बहुगुणा यांच्या विरोधात अलाहाबाद मतदारसंघातून लोकसभा निवडणूकीच्या प्रचारामध्ये वापरल्या गेलेल्या अमिताभ बच्चन यांच्या प्रमोशनल कार्डला चाहत्यांनी सर्वाधिक बोली लावली होती. हे कार्ड ६७,२०० रुपयांना विकले गेले.

तर जंजीर, जमीर, दीवार, राम बलराम यांसारख्या चित्रपटांचे शोकार्ड्स, दोन्ही हाताने कोलाज केलेले आणि ऑफसेट अशा सर्व वस्तूंना 50,000 रुपयांपची बोली लावण्यात आली. त्या सोबतच 'शोले'मधील धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्या मैत्रीचे अनेक फोटोजही लिलावासाठी ठेवण्यात आले होते, पण त्याची किती रुपयांनी बोली लावली अद्याप ते गुलदस्त्यात आहे.

याशिवाय अमिताभ बच्चन यांचे ब्लॅक अँड व्हाईटमधले अनेक फोटो सुद्धा लिलावासाठी वापरण्यात आले. त्यामध्ये लिलावात बिग बींच्या मोहम्मद अलीसोबतच्या फोटोचाही समावेश आहे. त्यासोबतच, अमिताभ बच्चन, अमिताभ बच्चन यांचे भाऊ अजिताभ बच्चन आणि वडील हरिवंशराय बच्चन यांच्यासोबतचे फोटो देखील लिलावामध्ये ठेवण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीत ट्विस्ट! गुलाल उधळला पण निकाल कोर्टात, सोलापूरनंतर धुळ्यातील विजयाने भाजपचं टेन्शन वाढलं

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये ताराच्या कुंपणात अडकलेल्या बिबट्याची सुटका

Men's Day: 'होय पुरूषही रडतात...', बोरिवली स्टेशनवर ढसाढसा रडणारा तो तरुण कोण? VIDEO ची होतेय चर्चा

Relationship Tips: तिशीत Single आहात? परफेक्ट पार्टनर शोधताय? मग 'या' सिक्रेट टिप्स ठरतील फायदेशीर

Winter Ear Care Tips: थंडीच्या दिवसात कानांची काळजी कशी घ्यावी?

SCROLL FOR NEXT