Vidya Balan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Vidya Balan : वजन कमी करण्याचं विद्या बालनचं सीक्रेट, रोज सकाळी प्यायची 'हे' अँटी इंफ्लेमेटरी ड्रिंक

Vidya Balan Weight Loss Secret : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने तिच्या कमी वजनाचे रहस्य सांगितले आहे. विद्या बालनचा डाएट प्लान जाणून घ्या.

Shreya Maskar

बॉलिवडूची अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) सध्या तिच्या 'भूल भुलैया -३'या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटात तिने 'मंजुलिका'ची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी विद्या बालनने वजन कमी केले होते.

विद्या बालनला अनेक वेळा तिच्या वाढत्या वजनामुळे ट्रोल करण्यात आले होते. मात्र आता तिच्या नवीन लूकमुळे तिचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. तसेच सर्वांनाच तिच्या कमी वजनाचे रहस्य जाणून घ्यायचे आहे.

विद्याने दिलेल्या एका मिडिया मुलाखतीत तिच्या कमी वजनाचे रहस्य सांगितले आहे. विद्याने वजन कमी करण्यासाठी 'अँटी इंफ्लेमेटरी' डाएट फॉलो केले. अँटी इंफ्लेमेटरी डाएटमध्ये शरीरातील दाहक-विरोधी गुणधर्म कमी करण्यावर भर दिला जातो. ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते. हे अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरने परिपूर्ण असते. विद्याने वजन कमी करण्यासाठी नियमित 'अँटी इंफ्लेमेटरी मॉर्निंग ड्रिंक' प्यायले आहे. हे 'अँटी इंफ्लेमेटरी मॉर्निंग ड्रिंक' कसे असते जाणून घ्या.

अँटी इंफ्लेमेटरी मॉर्निंग ड्रिंक रेसिपी

साहित्य

  • गरम पाणी

  • आलं

  • हळद

  • गूळ

  • मध

  • ग्रीन टी ची सुकलेली पाने

  • काळी मिरी

कृती

सर्वप्रथम पाणी छान उकळवा आणि त्यात किसलेले आलं घाला. थोडी हळद, गूळ आणि मध घालून उकळू द्या. पाणी अधिक पोषक बनवण्यासाठी तुम्ही त्यात तुम्ही ग्रीन टी ची सुकलेली पाने, काळीमिरी देखील टाकू शकता.

अँटी इंफ्लेमेटरी मॉर्निंग ड्रिंक पिण्याचे फायदे

  • अँटी इंफ्लेमेटरी मॉर्निंग ड्रिंकमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते.

  • हळद मधील दाहक-विरोधी गुणधर्म शरीरातील घाण बाहेर टाकून वजन कमी करण्यास मदत करते.

  • अँटी इंफ्लेमेटरी मॉर्निंग ड्रिंकमुळे कोलेस्ट्रेरॉल नियंत्रणात राहून हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

SCROLL FOR NEXT