बॉलिवूड अभिनेत्री तनिष्ठा चटर्जीला कर्करोगाचे निदान झाले.
सोशल मीडियावर पोस्ट करून अभिनेत्रीने आपल्या हेल्थची माहिती दिली आहे.
तनिष्ठा चटर्जीने आपला एक फोटो देखील शेअर केला आहे.
मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली आहे. ज्याचा खुलासा तिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून केला आहे. अभिनेत्री तनिष्ठा चटर्जीला (Tannishtha Chatterjee) स्टेज 4 ऑलिगोमेटास्टॅटिक कर्करोगाचे (Oligometastatic Cancer) निदान झाले. तिला याची माहिती 8 महिन्यांपूर्वी समजली. तिने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहे. एका फोटोत तिच्या बहिणी , मैत्रिणी दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत तनिष्ठा चटर्जी सोफ्यावर बसलेली दिसत आहे. तिचे केस कापले आहेत. ती पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.
"गेल्या 8 महिने खूप कठीण गेले. माझे वडील कर्करोगामुळे मी गमावले. आता 8 महिन्यांपूर्वी मला स्टेज 4 ऑलिगोमेटास्टॅटिक कर्करोगाचे निदान झाले. ही खास पोस्ट वेदना आणि दुःख सांगायला नसून प्रेम व्यक्त करायची आहे. यापेक्षा वाईट असू शकत नाही की, 70 वर्षांची आई आणि 9 वर्षांची मुलगी दोघीही पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहेत. पण सर्वात वाईट क्षणांमध्ये, मला एक असाधारण प्रकारचे प्रेम सापडले. जे तुम्हाला कधीही एकटे वाटू देत नाही. मला ते माझ्या मित्रांमध्ये आणि कुटुंबात सापडले. ज्यांच्या पाठिंब्यामुळे कठीण दिवसांतही माझ्या चेहऱ्यावर खरे हास्य आणले.
एआय आणि रोबोट्सकडे धावणाऱ्या जगात खऱ्या, उत्साही माणसांचे प्रेम मला वाचवत आहे. त्यांची सहानुभूती, त्यांचे मेसेज, त्यांची उपस्थिती मला जगण्यास मदत करत आहे. महिला मैत्रीला सलाम... माझ्यावरचे प्रेम, सहानुभूती आणि मला कठीण काळात शक्ती दिल्यामुळे...तुमची खूप आभारी आहे."
सध्या तिच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकार मित्रांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ती या आजारातून लवकर ठीक होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. तनिष्ठा चटर्जी 'पार्च्ड','जोरम' आणि 'गुलाब गँग' यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.