Swara Bhaskar Marriage Photos Saam Tv
मनोरंजन बातम्या

Swara Bhaskar: स्वरा भास्करच्या लग्नाविषयी नाराजी, नेटकरी म्हणतात, 'ती मुस्लिम नसेल तर तिचं लग्न...'

समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद आणि बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्या लग्नावरून सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.

Chetan Bodke

Swara Bhaskar Marriage Controversy: समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद आणि बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्या लग्नावरून सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. अमेरिकेतील शिकागोतील इस्लामिक विद्वान यासिर नदीम अल वाजिदी यांनी सांगितले की, हा विवाह कायदेशीरदृष्ट्या योग्य असला तरी तो गैर-इस्लामिक आहे.

स्वराने नुकतेच फहाद अहमद यांच्या सोबत लग्न गाठ बांधली. ६ जानेवारी रोजी स्वराने कोर्ट मॅरेजसाठी अर्ज दाखल केला आहे. तब्बल ४० दिवसांनंतर ते कायदेशीर रित्या पती- पत्नी झाले आहेत.

यासिरने ट्विट करत सांगितले की, स्वरा भास्कर मुस्लिम नसेल आणि तिचा नवरा मुस्लिम असेल तर हे लग्न इस्लामिकदृष्ट्या वैध नाही. अल्लाह म्हणतात की, इस्लामला मानल्याशिवाय अनेक धर्मांवर विश्वास ठेवणाऱ्या स्त्रियांशी लग्न करु नये. जर तिने केवळ लग्नासाठी इस्लाम धर्म स्विकारला असेल तरीही ते लग्न अल्लाहला मान्य होत नाही.

तर दुसरीकडे, प्रसिद्ध आर.जे सायमाने स्वरा- फहादचे लग्न वाचवण्यासाठी इस्लामिक विद्वानांच्या मतावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सायमा म्हणते, कुराणचे तुमचे उदाहरण योग्य आहे. पण तुम्ही चुकीचा सल्ला दिलात. स्वरा आणि फहादने तुमच्याकडे सल्ला मागितला का? आपण त्यांच्यावर कोणतीही गोष्ट लादणं बंद करायला हवं. अल्लाह तुम्हाला काहीही बोलणार नाही.

कंगना रणौतने ट्विट करत स्वरा भास्करला पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ट्वीट करत कंगना म्हणते, 'तुम्ही दोघेही लग्नानंतर खुप आनंदीत दिसत आहेत. लग्नगाठही स्वर्गात बांधली जाते पण बाकी सर्व औपचारिकता असते.' कंगनाप्रमाणेच अनेक सेलिब्रिटींनीही तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

स्वरा आणि फहाद एका राजकीय सभेत भेटले होते. 17 फेब्रुवारीला स्वराने लग्नसोहळ्यातील फोटो ट्विटरवर शेअर केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: तो प्रवास ठरला अखरेचा! मांजा अडकल्याने दुचाकी पुलावरून खाली कोसळली, बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: बिबट्याची दहशत आणि कांदा दरावरून उमेदवाराची हटके एन्ट्री

Haldi- Kumkum Gifts: हळदी- कुंकूवासाठी सर्वात बेस्ट, आजच खरेदी करा हे 5 वाण

Crime: कामाच्या बहाण्यानं राजस्थानला बोलावलं; १० दिवस डांबून सामुहिक अत्याचार नंतर..., महाराष्ट्रातल्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

Kidney Health: डायबेटीज आणि BPमुळे होतं किडनीचं नुकसान? डॉक्टरांनी सांगितलं धोकादायक सत्य

SCROLL FOR NEXT