Aarya 3 Trailer Released Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aarya 3 Trailer Released: 'कधी कधी मुलांचे रक्षण करण्यासाठी आईला राक्षस बनावे लागते', 'आर्या ३'चा थरारक ट्रेलर पाहिलात का?

Bollywood Actress Sushmita Sen: अनेक ट्विस्टसह ही सीरिज वेगळे वळण घेते आणि कथा पूर्णपणे बदलत असल्याचे टीझरमधून दिसून येत आहे.

Priya More

Aarya 3 Webseries:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या आगामी 'आर्य 3' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. सुष्मिताचे चाहते ही वेबसीरिज रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी या वेबसीरिजचा टीझर रिलीज करण्यात आला होता.

त्यानंतर आता निर्मात्यांनी या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज केला आहे. अनेक ट्विस्टसह ही सीरिज वेगळे वळण घेते आणि कथा पूर्णपणे बदलत असल्याचे टीझरमधून दिसून येत आहे.

आर्याच्या भूमिकेत पुनरागमन केलेल्या सुष्मिताने राम माधवानीच्या या वेबसीरिजमध्ये तिचे उत्कट व्यक्तिमत्त्व दाखवले आहे. तसंच, सिंगल मदर होऊन ती मुलांसाठी सर्व काही करते. आपल्या मुलांना वाचवण्यासाठी ती काहीही करू शकते हे या ट्रेलरमधून दिसून येतेय. आर्याच्या नुकताच रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये आर्या आणि तिची मुलं दिसत आहेत. यावेळी देसी माफिया झालेली आर्या आपला ड्रग्जचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करते. तिच्या मागे फक्त देशातील नाही तर परदेशातील लोकंही पडले आहेत. या वाघीणीला संपवण्याची सर्वांची इच्छा आहे त्यासाठी ते प्रयत्न देखील करत आहेत. पण आर्या पराभव स्वीकारणारी नाही.

आर्या 3 च्या ट्रेलरमध्ये, सुष्मिता सेनने साकारलेली भूमिका आर्याला पूर्वीपेक्षा अधिक उग्र अवतारात दाखवण्यात आली आहे. ती आता सर्व काही करत आहे ज्याचा तिला एकेकाळी तिरस्कार होता आणि ती तिच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवते. ट्रेलरमध्ये सुष्मिताची व्यक्तिरेखा अधिक मजबूत, अधिक दृढनिश्चयी आणि वाघिणीसारखी उग्र आहे. 'कधी कधी आईला आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी राक्षस बनावे लागते' असे म्हणताना ती आर्या दिसत आहे.

आर्या ३ चा हा ट्रेलर खूपच जबरदस्त आहे. आर्याला या संकटातून मार्ग सापडेल की तिच्या आयुष्याचा शेवट होईल? हे ही वेबसीरिज रिलीज झाल्यानंतरच समजेल. डिस्ने+ हॉटस्टारवर येत्या ३ नोव्हेंबरला ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजमध्ये सुष्मिता सेनव्यतिरिक्त इंद्रनील सेनगुप्ता, सिकंदर खेर, ईला अरुण, विकास कुमार, विनोद रावत हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : माजी आमदाराच्या भाजप प्रवेशावरून जिल्ह्यात राजकीय वादंग

Ration Shop : दिवाळी सणात निकृष्ट दर्जाचे रेशन धान्य वाटप; आळ्या, किडे असलेले धान्य मिळाल्याने नागरिकांचा संताप

Spruha Joshi In Saree: खूपच सुंदर दिसतेस स्पृहा जोशी, सौंदर्याकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या

India vs South africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी

Vashi Fire: नवी मुंबईत मोठ्या इमारतीत भीषण आग; चिमुकलीसह चौघांचा मृत्यू, घटनेमागे वेगळंच कारण समोर

SCROLL FOR NEXT