Sonakshi Sinha Reveals Why She Married With Zaheer Iqbal Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonakshi Sinha On Wedding : सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बालसोबत लग्न का केलं ?लग्नानंतर स्वत:च केला खुलासा

Sonakshi Sinha Reveals Why She Married With Zaheer Iqbal : सोनाक्षीने लग्नाच्या काही दिवसांनी, आंतरधर्मीय विवाह का केला? यावर भाष्य केले आहे. अभिनेत्रीने तिच्या लग्नाबद्दल एका मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे.

Chetan Bodke

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बालने २३ जूनला रजिस्टर मॅरेज केले. रजिस्टर मॅरेज केल्यानंतर अभिनेत्रीला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तुफान ट्रोल केलं होतं. सोनाक्षी आंतरधर्मीय विवाह करत असल्यामुळे तिचे आई- वडील दोघेही तिच्यावर नाराज होते, अशी चर्चा होती. काही काळानंतर, शत्रुघ्न सिन्हा यांनी मुलीच्या लग्नामुळे खुश असल्याचे सांगितले. सोनाक्षीने लग्नाच्या काही दिवसांनी, आंतरधर्मीय विवाह का केला? यावर भाष्य केले आहे.

नुकतंच सोनाक्षीने ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली आहे. मुलाखतीमध्ये तिने आपल्या पर्सनल लाईफबद्दल भाष्य केले आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये, सोनाक्षीने सांगितले की, "झहीरने माझ्या आयुष्यातील अनेक मुल्ये जोडली आहेत. याच कारणामुळे मी त्याच्यासोबत लग्न केलंय. माझ्या आयुष्यातील चढ- उताराच्या दिवसांमध्ये झहीरने एक सपोर्ट सिस्टिम म्हणून काम केले आहे. मी एक यशस्वी होण्याचं मुख्य कारण झहीर आहे. मी माझ्या घरी, कामाच्या ठिकाणी नेहमीच आनंदी असते. माझा आनंद कायमच माझ्या कामातून स्पष्टपणे दिसतो."

सोनाक्षीने पुढे मुलाखतीमध्ये सांगितले की, "मला वाटतं की, प्रत्येकाला आपआपल्या आयुष्यात झहीरसारखं प्रेम मिळावं. कारण तो त्याच्या लाईफ पार्टनरला पुढे जायला आणि पुढे जाण्यासाठी मदत करतो. त्यामुळेच मी माझ्या आयुष्यामध्ये खूप यश मिळवत आहे. माझ्या मते, पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही आयुष्यामध्ये माझा विकास होत आहे. मला यश मिळत आहे. "

शिवाय अभिनेत्रीने ट्रोलर्सलाही प्रत्युत्तर दिलं आहे. ट्रोलर्सला प्रत्युत्तर देताना सोनाक्षी म्हणाली, "एक ॲक्टर होण्याच्या नात्याने अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. ट्रोलिंगही सेलिब्रिटींच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. जे तुम्हाला सेलिब्रिटी झाल्यावर कळते." अशी प्रतिक्रिया तिने दिलेली आहे.

गेल्या ७ वर्षांपासून सोनाक्षी आणि झहीर रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेकदा हे कपल कॅमेऱ्यासमोर एकत्र स्पॉट झालेलं आहे. पण त्यांनी केव्हाच आपलं नातं लपवलं नाही. सोनाक्षीमध्ये आणि झहीर इक्बालमध्ये एक वर्षांचा फरक आहे.

सोनाक्षीहून झहीर एक वर्षाने लहान आहे. दोघांनीही डबल XL चित्रपटात एकत्र काम केले आहे. सलमान खाननेच झहीरला बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. २०१९ मध्ये रिलीज झालेल्या 'नोटबूक' चित्रपटातून झहीरने पदार्पण केलं होतं. पण तो चित्रपट फ्लॉप ठरला.

झहीरचे वडील सराफ व्यापारी आहेत, त्यामुळे त्यांची आणि भाईजानची ओळख फार जुनी आहे. सलमान खानमुळे सोनाक्षी आणि झहीरची भेट झाली होती. तेव्हापासून त्यांची मैत्री झाली. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि आता त्या प्रेमाचं रुपांतर लग्नात झाले असून त्यांनी आजपासून आपल्या नव्या इनिंगला सुरूवात केलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT